जत तालुक्यातील बिळूर येथील म्हैशाळ योजनेचे कामे त्वरित पूर्ण करा | ग्रामस्थांचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
उर्वरित काम तातडीने पूर्ण करून म्हैसाळ योजनेचे पाणी एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, खिलरवाडी, जिरग्याळ, शेळकेवडी, मिरवड या गावाना द्यावी यासाठी मा. उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देताना |
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील बिळूर येथील अपूर्ण असणारी म्हैशाळ योजनेचे कामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी व म्हैशाळ योजना अधिकारी यांना उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून म्हैसाळ योजनेचे पाणी एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, खिलरवाडी, जिरग्याळ, शेळकेवडी, मिरवड या गावाना द्यावी यासाठी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केले आहे. यावेळी प्रकाश बिरादार, रमेश कोरे उपसरपंच एकुंडी, भिमाना बिरादार, वीरेंद्र पाटील, राजू शेळके, लोकेश पाटील, इरप्पा यंगरे, पोपट सवदे, भिमाना बिरादार, भाऊसाहेब लोखंडे सरपंच खिलरवाडी, द्रौपदी लोखंडे, शिवपुत्र नाईक, परशराम म्हेत्रे अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात असे म्हंटले आहे की, म्हैशाळ पंपगृह विभाग क्र. २ मधील बिळूर क्र. २ ची कॅनॉल चे कामे १५ - पूर्ण झालेली आहेत म्हैशाळ योजनेतून पाणी सोडल्यास एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, खिलरवाडी, जिरग्याळ, शेळकेवडी, मिरवड या सर्व गावांना वरदान ठरणार आहे. सध्या उन्हाची तिव्रता वाढत असून जनावरांना व पक्षांना तसेच शेतीसाठी पाणी कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे. तसेच भविष्यात पिण्यासाठी या गांवाना टँकर मागणी करण्याची आवश्यकता भासणार नाही. म्हैशाळ योजनेतून पाणी सोडल्यामुळे दुष्काळी जत तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे. सदर योजनेतील फक्त २०० मीटरचं काम बाकी आहे.
तरी आपण सदर योजनेतील कामाची तातडीने पाहणी करावी व अपूर्ण असणारे ५ टक्के काम आपण लक्ष घालून पूर्ण करून योजनेतून पाणी सोडून जत तालुक्यातील जनतेला म्हैशाळ पाणी मिळवून द्यावे ही आग्रहाची मागणी शेतकाऱ्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment