जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने "हात से हात जोडो" अभियानास सुरुवात


जतवार्ता न्यूज नेटवर्क:- काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने आज हाथ से हाथ जोडो या कार्यक्रमाची सुरुवात आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या उपस्थितीत जत येथे करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते सुभाष खोत, कादर नायकवडी, अमित पारेकर , जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिरादार, जत पं. स. माजी सभापती बाबासाहेब कोडग, जिल्हा बँक संचालक सरदार पाटील, जि. प. सदस्य महादेव पाटिल, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय नाना शिंदे, पं. स. सदस्य रवींद्र सावंत ,बाजार समिती सभापती संतोष पाटिल, नगरसेवक परशुराम मोरे, महादेव कोळी, अशोक बन्नेनवर, सलीम पाच्छापुरे ,तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
     यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात देशातील महांगाई, देशाची सध्यस्थिती यावर भाष्य केले. मा.राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार देशातील सर्वसामान्य जनतेपर्यंत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पोहचून काँग्रेसच्या विचाराचा प्रसार करण्याचे तसेच देशातील जनतेला त्यांच्या अडीअडचणीत मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन