सिद्धार्थ शिक्षण संकुल जतच्या वतीने कार्यशाळा संपन्न


जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  जत तालुक्याचे भाग्यविधाते, राजकारण, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारे माजी आमदार कालकथित उमाजीराव सनमडीकर (काका) तालुक्यातील दुष्काळी ग्रामीण भागातील ऊसतोड मजूरांच्या मुलासाठी शिक्षणाचे द्वार खुले व्हावे, ते शिक्षणापासून वंचित न राहता त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी आश्रमशाळा सुरू करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम कालकथित उमाजीराव सनमडीकर यांनी केले होते. त्यांचा हा शैक्षणिक वारसा असाच पुढे चालू ठेवण्याचा मानस मनामध्ये बाळगून त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर आणि त्यांच्या पत्नी डॉ.वैशाली सनमडीकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सतत वेगवेगळे शिबीर, कार्यशाळा, व्याख्यानमाला, चर्चासत्रे यांचे आयोजन करीत असतात. त्यांच्याच एक भाग म्हणून आज सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी आणि श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन,जत यांच्या वतीने सर्व शाखामधील कर्मचाऱ्यांसाठी सिद्धार्थ पॉलीटेकनिक जत येठे, एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते." 
अलीकडील शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, सांगली(डाएट) चे अधिव्याख्याता श्री.डॉ.सुरेश माने सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.
      त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये शिक्षणाचे महत्व कश्याप्रकारे आहे. आपण शिक्षणाशिवाय कसे अपूर्ण आहोत ,आणि शिक्षणाशिवाय आपले जीवन कसे व्यर्थ आहे. शिक्षण आपल्या जीवनात एक ध्येय ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी कश्याप्रकारे प्रेरणा देते याविषयी सांगितले. तसेच,शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो.विध्यार्थ्यांना घडवण्याचे काम हे शिक्षकच करत असतात. विदयार्थ्यांचा कल,त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक कश्याप्रकारे योग्य मार्गदर्शन करू शकतात. विद्यार्थ्यांना शिकवताना आनंददायी, नावीन्यपूर्ण, पद्धतीचा अध्यापनात वापर व तणावमुक्त अध्ययन प्रक्रियेचा अवलंब करून जर अध्यापन केले तर ते जास्त प्रभावी ठरु शकते.हे त्यांनी खूप चांगले उदाहारणे देऊन सांगितले. शिक्षकाने स्वत:शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. इतरांना शिकवणा-याने सतत शिकत राहायला हवे.त्याची शिकण्याची प्रक्रिया कधीही बंद पडू नये.शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे.स्वत:चे विषयात पारंगतता प्राप्त करून घ्यावी. अध्यापन कला अवगत करून घ्यावी. शिक्षकाने आपले ज्ञान अदययावत करावे.त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा. कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास,शिक्षणातील आव्हाने,क्षमता विकास इत्यादी विषयावर खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
      ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी या संस्थेचे चेअरमन डॉ.सौ.वैशाली सनमडीकर ,  संस्थेचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर,कु.अनुष्क सनमडीकर, श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, जतचे चेअरमन भारत साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी दोन्ही संस्थेच्या सर्व शाखांमधील प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष