उपेक्षितांना न्याय देण्याचे काम परशुराम मोरेनी केले, अशा जनसेवकास भविष्यात जत शहराचे नेतृत्व करण्याची संधी जनतेने द्यावी; आमदार सावंत


जतवार्ता न्यूज नेटवर्क:- गोरगरीब वंचित व उपेक्षित लोकांना न्याय देण्याचे काम जागर फौंडेशनच्या माध्यमातून माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे हे सतत करत असतात. त्यांची ही सामाजिक बांधिलकी जत शहरातील जनता विसरणार नाही, असे प्रतिपादन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केले. येथील बचत भवन येथे जागर फौंडेशनच्या वतीने "आयुष्मान भारत कार्ड" अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
      यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे यांनी जागर फौंडेशनची स्थापना करून शहरात सामाजिक बांधीलकी जपली आहे. या फौंडेशनचे सर्व सदस्य शहरातील गोरगरीब, वंचित व उपेक्षित नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहेत. शहरात स्वच्छता मोहीमेतून परशुराम मोरे यांचे नाव घराघरात पोहोचले आहे. कोरोना काळात जागर फौंडेशनचे काम हे कधीही विसरता येण्यासारखे नाही. शासकीय योजना सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम मोरे यांनी केले आहे. रेशनकार्ड असो घरकुल, संजयगांधी निराधार योजना, स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शौचालय अशा शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना देण्याचे काम जागर फौंडेशनने केले आहे. स्व. भिमराव दादा मोरे यांनीही गोरगरिबांसाठी मोठे योगदान दिले आहे. त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम त्यांचे पुत्र परशुराम हे करीत आहेत. याचे कौतुक सर्वत्र होत आहे. 
      जागर फॉऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे म्हणाले, आयुष्मान भारत योजनेचे आतापर्यंत 4 हजारहून अधिक लाभार्थ्यांना फायदा झाला आहे. शहरातील प्रत्येक घटकाला याचा लाभ मिळेपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार आहे. केंद्र सरकारने सुरु केलेली ही योजना गरजू व गोर गरीब जनतेच्या हिताची आहे. त्याचा लाभ नागरिकांना व्हावा यासाठी परशुराम मोरे यांनी हे अभियान सुरू केले आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत परशुराम मोरे सामाजिक काम करणाऱ्या तसेच सामान्य जनतेशी नाळ असणाऱ्यांना मदत करण्याचे धोरण शहरातील नागरिकांनी ठेवण्याची गरज आहे. यापुढेही उपेक्षित लोकांसाठी मी काम करीत राहणार आहे. 
      यावेळी जिल्हा बँकेचे संचालक  सरदार पाटील, विक्रम फौंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम, माजी सभापती बाबासाहेब कोडग, प्रसिद्ध अभियंता अशोक बननेंवर, महादेव कोळी, अरुण साळे, कुमार साळे, सुनील बागडे व जागर फाऊंडेशनची टिम उपस्थितीत होती. प्रास्ताविक राजेंद्र माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष