मनसेच्या इशारानंतर जत तालुक्यात म्हैसाळचे पाणी दाखल


जतवार्ता न्यूज नेटवर्क:- पालकमंत्री तथा कामगारमंत्री, सुरेश खाडे यांनी त्यांच्या मिरज मतदारसंघात म्हैसाळचे पाणी सोडले आहे. पण जत, कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी सोडले नसल्याचा निषेध करत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार यांनी जतला म्हैसाळचे पाणी सोडा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या आंदोलनाच्या इशारानंतर म्हैसाळचे पाणी सोडण्यात आले आहे. तालुक्यातील डोरली येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले आहे.
     तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जत तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. जनावरांना, पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्यास सुरवात झाली आहे. तालुक्यातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहेत. विहिरी, बोअरवेल यांची पाणी पातळी कमी होत आहे. म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे आवर्तन २० फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आले आहे. सदरचे पाणी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी फक्त मिरज तालुक्यात सोडले आहे. दुष्काळी कवठेमहांकाळ व जत तालुक्याला पाणी सोडलेले नाही.
     पालकमंत्री हे जिल्ह्याचे आहेत की केवळ मिरज तालुक्याचे आहेत हा दुष्काळी भागातील जनतेला पडलेला प्रश्न आहे असे निवेदन दिले होते. म्हैशाळ योजनेचे पाणी कुंभारीत दाखल झाले आहे. चार महिने हे आवर्तन सुरू राहणार असल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पवार म्हणाले. या मुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासणार नाही. असे मुकेश पवार म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड