श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने वाहक विजय शिंदे यांचा सेवानिवृत्तीनंतर सत्कार


जत वार्ता न्यूज नेटवर्क :- श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीने जत एस.टी.आगाराचे वाहक विजय शिंदे यांचा सेवानिवृत्तीनंतर सत्कार करण्यात आला.
      जत एस.टी.आगारात  वाहक म्हणून कार्यरत असलेले श्री.विजय सोपान शिंदे हे त्यांच्या तीस वर्षाच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे वडिल कै.सोपान शिंदे हे ही एस.टी.आगारात चालक होते. श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत च्या वतीने विजय शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल,श्रीफळ देऊन व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
      या वेळी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे,मराठा ग्रामीण बिगर शेती सह. पत.संस्थेचे चेअरमन श्री.गणेश सावंत आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

"एक वृक्ष - माझ्या भविष्यासाठी" राजे रामराव महाविद्यालयात नवोपक्रम|प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण