जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे मायलेकीची गळाआवळून हत्या


जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे संशयावरून पत्नी व १४ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आसल्याचा प्रकार सोमवारी उघडीस आला आहे. या घटनेने जत तालुक्यात एकच खळबळ उडाली. जत तालुक्यातील कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथे ही ह्रदयद्रावक घटना घडली. पतीनेच संशयावरुन खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीसाकडून वर्तवला जात आहे. आई प्रियंका बिराप्पा बेंळुखी (वय-३२) व मुलगी मोहीणी बिराप्पा बेंळुखी (१४) असे मृत मायलेकीची नावे आहेत.
      रविवारी मध्यरात्री संशयावरुन पतीनेच प्रियंका व मोहीणी या मायलेकीचा गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. कुणीकोणूर ते सनमडी रोडवर असलेल्या बेळंखी वस्ती येथे राहणाऱ्या बेराप्पा बेळंखी यांच्या घराजवळील झोपडीत ही घटना घडली आहे. या घटनेची वर्दी पोलिस पाटील तानाजी कृष्णदेव पाटील यांनी उमदी पोलिसांत दिली आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पथकासह घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन