राज्य परिवहन महामंडळाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त "जागर फाऊंडेशन"च्या वतीने महास्वच्छ्ता मोहिम | आगार प्रमुखांनी मांणले आभार



जतवार्ता न्यूज नेटवर्क:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जत येथील"जागर फाऊंडेशन" च्या वतीने महास्वच्छ्ता मोहिम राबविण्यात आले. या मोहिमे अंतर्गत जत बस स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छ्ता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जत आगार प्रमुख सुनंदा देसाई यांनी केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जागर फाऊंडेशन जतचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे या नि आपल्या स्वयंसेवकांसह जत बसस्थानक परीसर स्वच्छ करण्यात आला.
       स्वच्छ्ता मोहिमेनंतर बोलताना आगार प्रमूख देसाई म्हणाल्या, जागर फाऊंडेशन चे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण आज खऱ्या अर्थाने जत आगार परीसरातील कानाकोपरा स्वच्छ झाला आहे. यापुढेही त्यांचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा आहे.
       या स्वच्छ्ता मोहिमेत जागर फाऊंडेशन चे अरुण साळे, गोपाळ पाथरुट, बाळू कांबळे,अबास मुजावर, आनंद कांबळे, अभिनंदन साबळे,अमोल पवार,अभिषेक कांबळे, निखिल कलाल,विजय मोरे,अर्जुन चव्हाण,कृष्णा चव्हाण तसेच प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड