शहरातील पाणीप्रश्नी रिपाइं आक्रमक | जत नगरपरिषदेस ठोकले टाळे

किमान दररोज एक तास पाणी सोडण्याची मागणी

जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये दररोज किमान एक तास पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी रिपाइं (आठवले गट) यांच्यावतीने मंगळवारी सकाळी जत नगरपरिषदेस टाळे ठोकण्यात आले.
       जत शहराला ७६ कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊनही दररोज मुबलक पाणी मिळत नाही. पाण्याच्या प्रश्नासह वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा आदी मागण्यांसाठी पक्षाच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले होते. दि. २० जून पर्यंत मागण्याची पूर्तता न केल्यास जत नगरपरिषदेस टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. परंतु प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही व पूर्तता केली नाही. त्यामुळे कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ नगरपालिकेत आले. त्यावेळी अधिकारी नगरपालिकेत उपस्थित नव्हते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी ढेरे यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. जबाबदार कोणीही अधिकारी नसल्यामुळे नगरपरिषदेचे कामकाज रामभरोसे चालले आहे. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारास टाळे ठोकून निषेध व्यक्त केला व निदर्शने केली. 
       यावेळी सा.मि.कु.माजी महापौर विवेक कांबळे उपस्थित होते. भ्रमणध्वनीवरून ढेरे यांनी शुक्रवारी २३ जून रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, किशोर चव्हाण, संजय कांबळे, हेमंत चौगुले, सुभाष कांबळे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड