माजी आमदार सनमडीकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिरामध्ये २५० हुन अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी

जतवार्ता न्यूज नेटवर्क:- काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार आदरणीय उमाजीराव सनमडीकर (काका) यांची ८५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये काकांना आदरांजली वाहण्यात आली.

      या ८५ व्या जयंतीनिमित्त कमल ऑर्थोपेडीक सेंटर,जत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे "भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उदघाटन श्रीमती कमल उमाजीराव सनमडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

       माजी आमदार सनमडीकर यांनी ज्याप्रमाणे जत सारख्या दुष्काळी तालुक्यामध्ये राजकीय, सामाजिक, वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले, त्यांचप्रमाणे. त्यांचे चिरंजीव डॉ.कैलास सनमडीकर आणि सून डॉ.वैशाली सनमडीकर हे वैद्यकीय क्षेत्रामद्ये जत तालुक्यातील गोर गरीब, गरजू रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. आजपर्यन्त त्यांनी आपल्या हॉस्पिटल मध्ये हजारो रुग्णांना मोफत उपचार व शस्त्रक्रिया करून जिवदान दिले आहे. यावेळी वय वर्षे ४० पुढील सर्वांसाठी ई.सी.जी., मधुमेह, रक्तदाब आधी समस्यांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे डायलेंसिस वरती हि विशेष सवलत होती. या संधीचा लाभ २५० हुन अधिक रुग्णांनी घेतला. यावेळी डॉ. कैलास सनमडीकर, डॉ.वैशाली सनमडीकर, डॉ. के. प्रसाद, डॉ.जानकर, डॉ.हरीश माने, नसिर मुल्ला, यलाप्पा चिगदुळे, रायगोंडा पाटील, दामाजी पवार, शहाजी घाटगे, भिमु बिरादार, आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सर्व संस्थेचे प्रचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनीं उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष