महिलांनी सक्षम बनणे काळाची गरज; आमदार विक्रमसिंह सावंत


जतमध्ये 'धीरज उद्योग समूहाचे' उद्घाटन


जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  महिलांनी फक्त चूल आणि मूल याच्या पुढें जाऊन स्वावलंबी बनून स्वतः च्या पायावर उभं राहता आले पाहिजे. कुठुंबतील एक सदस्य म्हणून आपण ही स्वतःचं वेगळं आस्तित्व निर्माण केलं पाहिजे असे मत आमदार विक्रमसिंह सावंत यांनी धीरज उद्योग समूहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
      साळे परिवाराने जत मधिल महिलांसाठी व्यवसाय उभारून त्यांना सक्षम करण्यासाठी समाज्यामध्ये वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आम्हीही विक्रम फाउंडेशन च्या माध्यमातुन महिलांसाठी नवनवीन उपक्रम राबविनार आसल्याचे आमदार सावंत यांनी यावेळी सांगितले.

      जत शहरात महिला भगिनींसाठी घरबसल्या उद्योग व हाताला काम देणेसाठी एक नवीन संकल्पना घेऊन महिलांना सक्षम करण्यासाठी घरबसल्या पापड तयार करणेचे काम घेऊन येत आहोत, तरी जत शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या उद्योग समूहामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन धिरज उद्योग समूहाच्या संचालिका माजी नगरसेविका सौ.वनिता अरुण साळे यांनी केले आहे.
      सहभागी महिलांना मोफत ५ दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर उद्योगसमूहा मार्फत पापड तयार करणेचे सर्व मटेरियल उपलब्ध करून दिले जाईल. तयार केलेले पापड उद्योग समुह घेऊन जाईल. या मधून महिलांना घरबसल्या हजारो रूपये प्रति महिना उत्पन्न कमावण्याची संधी मिळेल.
      यावेळी जागर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे, माध्यमिक शिक्षक बँकेचे चेअरमन प्रा. राजेंद्र माने, किसन व्हनखंडे, समाजसेवक श्रीकांत सोनवणे, मोहन माने-पाटील, अरुण साळे आदीजन उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड