देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे; उपविभाग पोलीस अधिकारी सुनील साळुंखे
संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात १२६ जणांचा उत्फुर्त सहभाग
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फौडेंशनच्या वतीने बचत भवन जत येथे आयोजित रक्तदान शिबिरात १२६ भक्तांनी उत्फुर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे उद्घाटन जतचे पोलीस उपविभाग अधिकारी सुनील साळुंखे यांचे हस्ते दिप प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशाला शांती देण्याचे महान कार्य निरंकारी मंडळ करित आहे. आपण आज पाहतो आहे की जगामध्ये हिंसाचारापोटी अनेकांचे रक्त नाल्यामध्ये फुकटचे व्यर्थ जात आहे. निरंकारी मंडळाचा उद्देश चांगला आहे. रक्त नाल्यामध्ये न वाहता मानवांच्या नसामध्ये वाहिले पाहिजे, आजच्या काळात मंडळाच्या विचारधारेची गरज आहे. त्यांनी मिशनच्या मानवतावादी कार्यास शुभेच्छा दिल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज रक्तपेढी मार्फत रक्त संकलन करण्यात आले. रक्तपेढीचे डॉ जगदीश कुमार रक्तदानाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, एका व्यक्तीने जर रक्तदान केले तर तीन लोकांना जीवनदान मिळु शकते. यावेळी देवराजजी काळे, स्टेट बँकेचे शाखाधिकारी रोहित नायकुडे, अविनाश साळुंखे, तहसील विभागाचे लक्ष्मण तोटावाड तसेच स्थानिक प्रबंधक व सेवादल अधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर दुपारी आयोजित सत्संग समारोहामध्ये १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समिती जत चे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व कार्यक्रमाचे उत्तम नियोजन जत शाखेचे मुखी जोतिबा गोरे तसेच संभाजी साळे यांचे मार्गदर्शनाखाली सेवादल स्वयंसेवकांचे सहकार्याने करण्यात आले.

Comments
Post a Comment