आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेकरावजी कांबळे यांचे उपस्थितीत जत तालुका कार्यकर्ता संवाद बैठक मेळावा संपन्न

केंद्रीय मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचा जत दौरापुर्व नियोजन बैठक


जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत तालूका आर.पी.आय.(आठवले) पक्षाचे वतीने केंद्रीय मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांचा जूलै महिन्यामध्ये विवीध विकास कामांचे उद्घाटन कार्यासाठी जत तालुक्यामध्ये नियोजित दौरा आयोजित आहे. या दौरा पुर्व नियोजना करीता रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जत वाचनालय भवन येथे आयोजित करणेत आला होता.
       यावेळी बैठकीचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान कार्याध्यक्ष संजय कांबळे हे होते. यावेळी विवेकरावजी कांबळे यांचा रिपाइं(आ.) जत तालुका कार्यकारणीचे वतीने शाल अर्पण करून व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करणेत आला. तसेच उपस्थित मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करणेत आले.
       सर्वप्रथम सर्व महापुरूषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. बैठकीचे प्रास्तविक जत तालुका अध्यक्ष मा. संजय कांबळे/पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाकार्याध्यक्ष मा. संजयजी कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, रिपब्लिकन पक्ष हा भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्ष आहे. गेली ७० वर्षे गोरगरीबांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. तरी नामदार मा.डॉ. रामदासजी आठवले साहेब व भावी महाराष्ट्र राज्यमंत्री मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांचे हात आणखी बळकट करुया व ह्या महिन्यामध्ये आयोजित मा.ना.डॉ. आठवले साहेबांचा दौरा मोठ्या संख्येने उपस्थित राहून अशस्वी करूया. असे अवाहन मा. जिल्हाध्यक्ष मा. संजयजी कांबळे यांनी केले.
       यावेळी मा. विवेकरावजी कांबळे साहेब उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारे समाजकारण व राजकारण रिपब्लिकन(आठवले) पक्षाच्या माध्यमातून फळस्वरूपाला येत आहे. अनेक पंथाचे जातीधर्माचे लोक रिपब्लिकन पक्षामध्ये काम करण्यास इच्छूक आहेत. धर्मनिरपेक्ष भारत यहीं हमारा संकल्प है. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर संकल्पित असणार्या रिपब्लिकन पक्षाला नविन पालवी फुटत आहे. नागालेंड मिझोरम सारख्या राज्यांतून आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येत आहेत. मा.ना.डॉ. आठवले साहेब यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक होतकरू कष्टाळू तरूण तरूणींच कल्याण झालं आहे. विवीध क्षेत्रांत कुशल असणार्या गरजूंना सामाजिक न्याय विभागामार्फत योजना मिळवून दिल्या आहेत. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब जूलै महिन्यात विवीध विकासकामांचे उद्घाटनाकरिता जत तालुक्यात उपस्थित राहणार आहेत. तरी तालुका तसेच जिल्ह्यातून त्यांच्या स्वागतांसाठी मोठ्यासंख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे अवाहन यावेळी मा. विवेकरावजी कांबळे साहेब यांनी केले.
        यावेळी रिपब्लिकन(आठवले) सोशल मिडीया व आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, रिपाइं(आ.) चे जेष्ठ सदस्य विजयमामा कांबळे, आय.टी.सेलचे मिरज शहर अध्यक्ष पृथ्वीराज रांजणे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, किशोर चव्हाण वैद्यकीय सेल आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष मोहसीन इनामदार, जत महिला तालुकाध्यक्ष माया आदाटे, जत महिला शहराध्यक्ष अश्विनी देवकाते, जत तालुका कार्याध्यक्ष विनोद कांबळे, रिपाइं (आ) जत तालुका चर्मकार आघाडी अध्यक्ष गणेश साळे, महावीर मडीमनी, सुनील गोळे, उत्तम कांबळे, सुनील कांबळे (बिळूर), जत विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजू कांबळे, जत तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,  अंबु कांबळे, बाबासाहेब कांबळे, राहुल चंदनशिवे, एकोंडी गावचे तुकाराम कांबळे, जॉन बल्हारी, कांचन कांबळे, माजी मुख्याध्यापक केशव सुर्वे, शंकर वाघमारे, आदिवासी पारधी समाज संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष बसवराज चव्हाण, भिवर्गीचे मनोहर कांबळे, संतोष सनदी, अविनाश वाघमारे, येळदरी गावचे योजना सावंत, कुणीकुणुरचे संजय शिवाजी कांबळे, रिपाइं(आ.) मातंग आघाडीचे दुर्गापा आईवळे, यांचेसह जत शहर व तालुक्यामधून मोठ्यासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष