महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ नुतन कार्यकारणी जाहीर

ग्रामसेवक संघातील १० सभासदांचा युनियन मध्ये जाहीर प्रवेश



जत/प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई १३६ तालुका शाखा जत ची सर्वसाधारण सभा जत येथे आयोजित करण्यात आली. यावेळी जत तालुका संघातुन माझी तालुका अध्यक्ष महादेव शिलेदार, दादासाहेब चव्हाण यांचे नेतृत्वाखाली अरुण शिंदे, शिवाजी जाधव,विलास भोसले,अनिल ओलेकर,विनायक माळी,दत्ता माने, दत्ता साळे,कल्पना गवळी इत्यादी सभासदांनी युनियन मध्ये जाहीर प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार करुन स्वागत करण्यात आले. 
        यावेळी सभेमध्ये नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली तालुका अध्यक्ष पदी श्री अगतराव काळे,मानद अध्यक्ष पदी आप्पाराव बिरादार सचिव पदी राजेश ननवरे, सहसचिव पदी दत्ता साळे,उपाध्यक्ष पदी दिलीप शिंगे,चंद्रप्रभा तिटकारे कोषाध्यक्ष पदी कादर नदाफ,कार्याध्यक्ष पदी अनिल ओलेकर,प्रसिध्दी प्रमुख शंकर कोरे,कायदेशीर सल्लागार बापु खरमाटे,संघटक पदी आनंदा राठोड, धनाजी धवन,सुदर्शन जाधव,माधुरी बसर्गी,साहिला मणेर जिल्हा प्रतिनिधी म्हणून पैगंबर नदाफ,हुसेन पाटील,सुरेश खोत यांची एक मताने निवड करण्यात आली.
       यावेळी नुतन तालुका अध्यक्ष म्हणाले की तालुका सहीत जिल्हा व राज्यामध्ये सभासदाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे सध्या तालुक्यामध्ये ग्रामसेवक युनियनची सभासद संख्या जवळपास ८० पेक्षा जास्त आहे  तालुक्यातील सभासदांच्या प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी सर्वांना एकत्रित घेऊन प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत हुसेन पाटील, पैगंबर नदाफ,आभार बापु खरमाटे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन