जतच्या प्रश्नांसाठी डफळापुरात सांगली मार्ग रोखला; शेकडो शेतकरी रस्त्यावर
- Get link
- X
- Other Apps
राष्ट्रवादीचे नेते मन्सूर भाई खतीब आक्रमक
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
पावसाने ओढ दिल्याने जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जतचे प्रश्न तातडीने सोडवावेत, या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर भाई खतीब यांच्या नेतृवाखाली डफळापूर येथे जत सांगली मार्ग रोखून धारण्यात आला. या आंदोलनात 20 गावातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. यामुळे सांगली मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. 140 विसर्गाने या भागाला पाणी मिळावे अशी जोरदार मागणी करत, जिरग्याळ, एकुंडी, मिरवाड, वज्रवाड या भागाला प्रधान्याने पाणी मिळाले पाहिजे, अशी जोरदार मागणी मन्सूर खतीब यांनी केली आहे.
यंदा तालुक्यामध्ये पाऊस न पडल्यामुळे पिके वाळून गेली आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. तालुक्यात पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नाही. त्यामुळे म्हैसाळ योजना चालू करून तालुक्यातील तलावात पाणी सोडण्यात यावे, डफळापूर जिल्हा परिषद गटातील गावांना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे, यामुळे विजेच्या मोटरी जळत असल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पूर्ण क्षमेतेने वीज पुरवठा व्हावा, ऊस व विविध पिकांचे पंचनामे करून एकरी २५ हजार अनुदान द्यावे, प्रती जनावरे १५० रुपये एका जनावरांसाठी चारा रक्कम पशुपालकांच्या खात्यावर जमा करावी अथवा चारा डेपो, छावणी सुरू करावी, बिळूर कालवा २ मध्ये म्हैसाळसाठी ज्या जमिनी संपादित केल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे पैसे तातडीने द्यावेत. अंकले येथील वीज उप केंद्राचे काम तातडीने सुरु करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी संचालक मन्सूर खतीब, जिरग्याळच्या सरपंच सारिका पाटील, उपसरपंच सुनंदा कोरे, शिंगणापूरच्या सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच अलका पांढरे, मिरवाडच्या सरपंच पप्पूबाई सौदी, डफळापूरचे माजी उपसरपंच शंकर गायकवाड, पोपट सवदे , मारुती पाटील, जिरग्याळ सोसायटीचे चेअरमन साताप्पा पाटील, डफळापूरच्या चेअरमन सुवर्णा महाजन, कुडनूरचे माजी सरपंच बाबासाहेब पाटील , खलाटीचे माजी सरपंच केरु शेजूळ, बी. आर. पाटील, अनिल पाटील, यांच्यासह शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment