प्रकाश बंडगर ज्वेलर्समध्ये डायमंड दागिन्यांचे प्रदर्शन सुरू; ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; मान्यवरांची उपस्थिती



जतवार्ता न्यूज नेटवर्क:-  तालुक्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यापारी मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर ज्वेलर्समध्ये हिऱ्यांच्या दागिन्याचे प्रदर्शन व दालनाचा शुभारंभ दिमाखात संपन्न झाला. आमदार सौभाग्यवती वर्षाताई विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते दालनाचे उद्घाटन करण्यात आले. 
      यावेळी प्रकाश बंडगर म्हणाले की, जतसारख्या ग्रामीण भागातील लोकांना हिरे व हिऱ्याचे दागिने खरेदीसाठी सांगली, कोल्हापूर, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये जावे लागते.  मात्र आता जत येथील मे. प्रकाश बंडगर ज्वेलर्स सराफ दुकानात हिरे व हिऱ्याच्या दागिन्याचे दालन सुरू केले आहे. जत तालुक्यातील हे सोन्या-चांदीचे सराफ दुकान असून आता हिरे व हिऱ्यांचे दागिने या व्यवसायात पदार्पण केले आहे. कृष्णा डायमंड या नावाने हे दालन सुरू करण्यात आले आहे. ‌कृष्णा डायमंडचे व्यवस्थापक अमित गाडे यांनी स्वागत केले. 
      यावेळी विजया बिज्जरगी, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मिनाक्षी अक्की, नलिनी शिंदे, मे. प्रकाश शिवाप्पा बंडगर ज्वेलर्सचे मालक प्रकाश बंडगर यांचे बंधू चंद्रशेखर बंडगर, सुरेश बंडगर,  जत अर्बनचे संचालक श्रीमंत साळे, बाळासाहेब हुंचाळकर, महादेव हुंचाळकर, राम साळे, जयसिंग साळे, रमेश कन्नूरे,  सुप्रसिद्ध व्यापारी, आदर्श शेतकरी अर्जून सवदे , मनिष सारडा, राज्य व्यवस्थापक, किसना डायमंड, दिनकर पतंगे, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, गणपत कोडग, महावीर ओसवाल, गणेश गायकवाड, बाबूराव चव्हाण, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष महादेव सायार, सुनंदा शेडबाळे, रूक्मिणी साळे, मेघा साळे, शारदा साळे, गीतांजली शिंदे, महानंदा बंडगर, मंगल वाघमोडे, शशिकला बंडगर, धानेश्वरी बंडगर, धनाजी टोणे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष