जागर फाऊंडेशन कडून आणखी एक स्तुत्य उपक्रम; नागरिकांच्या मधून कौतुकाची थाप
जतवार्ता न्यूज नेटवर्क:- जत शहरातील गोरगरिबांचे कैवारी व सर्वांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे माजी नगरसेवक परशुराम मोरे, तसेच जागरफाऊंडेशन ह्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या सामाजिक संस्थेकडून आजअखेर अनेक सामाजिक कामे करण्यात आली आहेत.
गेल्या काही दिवसापासून शहरातील शहीद अंकुश सोलनकर चौक ते श्री बसवेश्वर चौक येथे दुभाजकसाठी राखीव ठेवलेल्या चारीमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत असून अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. तसेच या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आसल्याने आपघाताचे प्रमाण वाढूनये यासाठी जागर फाउंडेशनच्या माध्यमातुन दुभाजकासाठी सोडण्यात आलेली चर मुजवण्याचा निर्णय जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी हाती घेत कामास सुरवात केली. सध्या चर मुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असून. यासाठी जागर फाउंडेशनची टीम काम करीत आहे. तसेच यावेळी पोलिस प्रशासनाचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे.
विजयपूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर दुभाजकासाठी सोडण्यात आलेली चर जिवघेणी ठरत आहे. काही दिवसांपूर्वी गणेश पाटील या युवकाचा निष्पाप बळी गेला. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे. असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने त्यांच्या सोयीनुसार दुभाजक बनवावा. आम्हास नागरिकांचा जिव महत्त्वाचा आहे. त्यासाठी आम्ही जागर फाउंडेशनच्या वतीने चर मुजावण्याचे काम हाती घेतले आहे.
या कामामुळे नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त केले जात आहे. व मोरे यांच्यावरती कौतुकाची थाप पडत आहे.
Comments
Post a Comment