राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षांतर्गत बंडाळीचा जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर निषेध



जतवार्ता न्यूज नेटवर्क:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते मंडळींनी पक्षांतर्गत भंडारी केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी जत विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे ठाम आहे. उलट जत तालुक्यात आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी आणखीन भक्कम करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहीती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.
      सोमवारी एकीकडे अजित पवार गटाने जयंतराव पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याचे कळाल्यानंतर जतेत या घटनेचा राष्ट्रवादीने निषेध नोंदवला. शिवाय जतची अखंड राष्ट्रवादी शरद पवार आणि जयंतराव पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे असेही सांगण्यात आले. यावेळी नेते सुरेशराव शिंदे, मन्सूर खतीब, चन्नाप्पा होर्तीकर, उत्तमशेठ चव्हाण आदीजन उपस्थित होते.
      अध्यक्ष रमेश पाटील म्हणाले, अजितदादांनी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या विरोधात आहे. त्यामुळे जत तालूक्यातील पदाधिकाऱ्यांना हा निर्णय पटलेला नाही. ज्या शरद पवार यांनी अखंड हयात घालवून पक्ष उभा केला. अनेकांना वेगवेगळ्या पदावर बसवले. तरूणांची नवी टीम तयार केली. त्यांना सोडून जाणे उचित नाही. आम्ही तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तालुक्यात जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांचे विचार घरोघरी पोहचवणार आहोत.
      ज्येष्ठ नेते सुरेशराव शिंदे म्हणाले, ज्यांनी भानगडी केल्या, तेच पक्षातून बाहेर गेले आहेत. पक्षाच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्ता कुठेही गेला नाही. महराष्ट्रातील जनता पवार साहेबांच्या विचारांची आहे. त्यामुळे येणारा काळ आणखीन चांगला असणार आहे. जत तालुका नेहमीच पवार साहेबांच्या व जयंत पाटील यांच्या पाठीशी राहीला आहे, या कठीन काळातही आम्ही त्यांच्या सोबतच राहणार आहोत असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड