जत येथे श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरूपोर्णीमा मोठ्या उत्साहात साजरी



जतवार्ता न्यूज नेटवर्क:- श्री स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत यांच्यावतीनै आज गुरूपोर्णीमेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक घालून पूजा करण्यात आली.सकाळी दहा ते बारावाजेपर्यंत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.
       त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता श्री.स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर पुष्प वाहण्याचा कार्यक्रम पार पडला नंतर श्री.स्वामींची आरती करण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्व श्री.स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच प्रत्येक भक्ताला सफरचंद वाटप करण्यात आले.
      श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे कुटुंबप्रमुख व झी टाॅकीज फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.श्री.सागर महाराज बोराटे यांच्या संकल्पनेनुसार यावर्षीही श्री.स्वामी समर्थ मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
       हा कार्यक्रम चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब पवार, उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, लक्ष्मण उर्फ पिंटू मोरे,गणेश सावंत, मोहन पवार, नारायण पवार,सदाशिव जाधव, अतुल मोरे,डी.बी.जाधव,शहाजीबापू भोसले, दीपक पाटणकर,समर्थ पवार आदींचे सहकार्य लाभले.
       यावेळी श्री.संभाजी साळे,माजी प्राचार्य श्री.वसंतराव बोराडे,सुनिल जाधव,दुय्यम निबंधक अधिकारी श्री.राहुल हंगे,बिरा वगरे,राहुल वायफळकर आदींसह मोठ्या संख्येने स्वामीभक्त उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष