जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द,चिकाटी व मेहनत महत्वाची; संभाजीराव सरक
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
"विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत ही अत्यंत महत्त्वाची आहे. दे रे हरी, खटल्यावरी! अशी वृत्ती आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. " असे प्रतिपादन श्री.संभाजीराव सरक यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथील रसायनशास्त्र विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे रामराव महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. सतीशकुमार पडोळकर हे उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते म्हणाले, करियर साठी शहरात जाताना आपल्या मनामधील न्यूनगंड बाजूला करून कामाला लागा. नक्कीच एकेदिवशी तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहचाल. पण त्यावेळी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो, हे विसरू नका."
यावेळी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के. के. रानगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर राजे रामराव महाविद्यालय जतच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व एम एस सी रसायनशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ यांनी एकंदरीत राजे रामराव महाविद्यालयात एम.एस्सी अभ्यासक्रम सुरू होण्याचा प्रवास व त्यामागील संस्थेची भूमिका याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गणेश चौगुले, प्रास्ताविक कुमारी कोमल पाटील व आभार कुमारी गौरी मुरकुटे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
या कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रा. राजेश सावंत, प्रा. प्रा.कु. मेहेजबीन रफिक मुजावर, प्रा. कु. शाहीन पाटील, प्रा. कु. वैशाली मदने, प्रा. कु. अश्विनी पुजारी, प्रा. कु. प्रियांका भुस्नूर आदींसह विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment