जागर फाउंडेशन प्रसिद्धी आणि पुरस्कारासाठी नाही तर सामाजिक कर्तव्य म्हणून काम करतो; परशुराम मोरे

जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
      शहरातील दुभाजकासाठी सोडलेल्या अरुंद खड्डयात दुचाकी वाहने जाऊन अपघात झाले यामध्ये काहीजण जायबंदी झाले तर काहीजणांचा बळी गेला म्हणून जागर फाउंडेशनच्या माध्यमातून मी अध्यक्ष परशुराम मोरे आणि माझे सहकारी मित्र आम्ही  मिळून  जत विजापूर महामार्गावरील 
दुभाजकासाठी सोडलेली चर खड्डे काँक्रिट ने बुजवून तात्पुरती सोय करून अपघातास प्रतिबंध करण्यासाठी पुढाकार घेतला जेणेकरून कुणाचा बळी जावू नये कोण जायबंध होऊ नये यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रयत्न करत आहे.
       अजून काम पूर्ण झाले नाही कारण हा रस्ता महामार्ग असून वाहनांची वर्दळ असल्याने जे काँक्रिट केलं जातं आहे ते वाळले पाहिजे काही तांत्रिक अडचण आहेत त्या समजून घ्या काँक्रिटच्या दोन्ही बाजूस बरिकेट कमी ऊपलब्ध आहेत पोलीस ठाणे 6 आणि नगरपालिकेचे 4 बरिकेत उपलब्ध आहेत जेवढे बरीकेट आहेत त्यानुसार हे काम करत आहोत.
       पण वाहन चालकांच्या नाव पुढे करून आम्ही जागर फाउंडेशनने प्रसिद्धीसाठी काम करतो असा जावईशोध लावला जात आहे. याबाबत कोणतीही खात्री न करता अशा नाउमेद करण्याच्या पोस्ट लिहून सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व्यक्तीना बदनाम करण्याचा प्रयत्न दिसतो. पण आम्ही बदनामीला न घाबरता आमचे सामजिक कार्य जागर फाउंडेशनच्या माध्यमातून चालूच राहणार आपले मार्गदर्शन, योग्य सूचना आवश्य करा त्याचे स्वागत आहे. पण चुकीचे गैरसमज पसरवू नका एवढीच माफक अपेक्षा.

                      -परशुराम मोरे, अध्यक्ष, जागर फाउंडेशन जत.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड