मंत्री रामदास आठवले १४ जुलै रोजी जत दौऱ्यावर



जतवार्ता न्यूज नेटवर्क:- 
       केंद्रीय मंत्री रामदास आठवले दि.१४ जुलै रोजी जत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते जत शहरातील रस्ता डांबरीकरण व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती रिपाइंचे माजी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      या दोन्ही कामांसाठी आठवले यांच्या स्थानिक विकास निधीतील फंड मंजूर झाला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाभाऊ सरवदे व. विवेक कांबळे हे आहेत. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर दुपारी १ वाजता डॉक्टर, इंजिनिअर, वकील, व्यापारी, मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कांबळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन