चिक्कलगी भुयारमध्ये गुरुपौर्णिमेदिनी अन्नक्षेत्राचा शुभारंभ; दिवसभर सुरू राहणार अन्नक्षेत्र- तुकाराम बाबा


चिक्कलगी भुयारमध्ये गुरुपौर्णिमेदिनी अन्नक्षेत्राचा शुभारंभ प्रसंगी उदघाटनप्रसंगी मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, अमृत पाटील, सिद्धाप्पा मेडीदार व भाविक

जतवार्ता न्यूज नेटवर्क:- भुकेलेल्याना अन्न, तहानलेल्यांना पाणी देण्याचा दशसुत्री संदेश देणारे राष्ट्रीय संत गाडगेबाबा,  समाजसेवा हीच ईश्वरसेवा म्हणून कार्य करणारे वैराग्य संपन्न  श्री संत बागडे बाबा यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी सामाजिक, अध्यात्मिक कार्यात आपला एक वेगळा ठसा व वेगळी ओळख समाजकार्यातून जनमानसात निर्माण केली आहे.कोरोना, महापूर असो की कुठलीही आपत्ती मदत नवे कर्तव्य म्हणून मदतीचा हात देणारे तुकाराम बाबा महाराज यांनी चिक्कलगी भुयार येथे गुरुपौर्णिमेपासून अन्नछत्र सुरू केले आहे. 
      सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत चिखलगी भुयार येथे येणाऱ्या भाविकांसाठी त्याचबरोबर हुन्नूर, हुलजंती व पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या साठी येथे मोठ्या प्रमाणात दररोज अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
      गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर यावर्षी असून श्री संत बागडेबाबा अन्नक्षेत्र मंडळाच्या वतीने चिक्कलगी भुयार येथे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे.  या अन्नक्षेत्राचे उदघाटन भाविक अमृत पाटील, सिद्धाप्पा मेडीदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, रतन शहा बँकेचे नाजरकर, बेंगलोर येथील भाविक गुरव शास्त्री, प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ञ लिंगायत ताई महाराज, विजयपूर येथील शिवराज जाधव, रेवण मलाबदी, रामनिंग मेडीदार, शिवराया हात्तळी, मल्लेशा हात्तळी, संतोष चेळेकर, सिद्धय्या उमराणी, काशीराम चौगुले, चिदु हात्तळी, महेश भोसले, बसवराज तेली, शुराणणा उमराणी, भारत खांडेकर, राजू चौगुले आदी उपस्थित होते.
       उदघाटनपर भाषणात बोलताना अमृत पाटील, सिद्धाप्पा मेडीदार म्हणाले की,  बालपणापासून अध्यात्म व सामाजिक क्षेत्रात काम करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. चिक्कलगी भुयार येथे अन्नक्षेत्र सुरू केल्याने भाविकांची सोय होणार आहे. अन्नक्षेत्राला भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्री. नाजरकर, श्री. गुरव शास्त्री, लिंगायत ताई महाराज, शिवराज जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना तुकाराम बाबांच्या कार्याचा उहापोह करत मठाला , बाबांच्या कार्याला सहकार्य करू अशी ग्वाही दिली

अन्नक्षेत्राचा भाविकांनी लाभ घ्यावा- तुकाराम बाबा महाराज
     वैराग्यसंपन्न बागडेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चिक्कलगी भुयार मठाला अध्यात्माची, सामाजिक कार्याची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक व अन्य राज्यातून भुयारला मोठया संख्येने भाविक येतात. भुयारपासून जवळच असलेल्या हुन्नूर, हुलजंती देवस्थान व पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या साठी खास अन्नक्षेत्र सुरू केले आहे. रात्री दहा पर्यत अन्नक्षेत्र सुरू राहणार आहे. अन्नक्षेत्राचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन