गाईच्या मुखात अडकलेला तांब्या काढण्यात यश


जतवार्ता न्यूज नेटवर्क:- 
     जत शहरातून मोकाट फिरणा-या गाईच्या मुखात अडकलेला तांब्या काढण्यात गोरक्षक अलगुर महाराज व पशुवैद्यकीय डाॅक्टर प्रविण वाघमोडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश! सर्व स्थरांतून दोघांचेही होत आहे अभिनंदन.
     याबाबत सविस्तर माहीती अशी की, जत शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत आहेत. या जनावरांवर चारा नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ही जनावरे चारा पाण्याच्या शोधात दारोदार फिरत आहेत. परंतु या जनावरांचे पोट भरत नाही. त्यामुळे ही जनावरे रस्त्यावर पडलेली प्लॅस्टिक कागदात लोकांनी टाकलेले अन्न खाऊन आपली भूक भागवीत आहेत.
     नुकतेच जत शहरात चारा व पाण्याच्या शोधात फिरत असलेल्या गाईने तांब्यातील अन्न खात असताना तो तांब्या या गाईच्या जबड्यात अडकला. तांब्या जबड्यात अडकल्याने ही गाय सैरभर होऊन वाट दिसेल तिकडे पळत होती. जत शहरातील अनेक जनानी गाईच्या जबड्यात अडकलेला हा तांब्या काढण्याचा प्रयत्न केला परंतु गाई बिथरली असल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. 
      गुरूवारपासून ही गाय आपल्या जबड्यात तांब्या घेऊन गावभर भटकत होती हे सर्व पाहून शहरातील नागरिक हळहळ व्यक्त करित होते.सर्वजन गाईच्या जबड्यातील अडकलेला तांब्या काढण्यासाठी धडपडत होते.
     अखेर येथिल पशुवैद्यकीय डाॅक्टर व सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाघमोडे, 
गोरक्षक बसवराज अलगुर महाराज आदीनी अथक परिश्रम घेऊन या गाईला पकडून बांधून घातले हे करत असताना त्यांच्या पायाला जखमाही झाल्या परंतु त्यानी या मुक्या प्राण्याचे होत असलेले हाल पाहून सर्व काही सहन केले.
     त्यानंतर डाॅ.प्रविण वाघमोडे व अलगुर महाराज यांनी गोपी तेली, अमोल चव्हाण, रोहण शिंदे, राकेश चौगुले, संदिप पट्टणशेट्टी, विश्वेस जोशी,या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने गेली चार दिवस गाईच्या जबड्यात अडकलेला तांब्या काढून गाईला जिवदान दिले.
     गोरक्षक अलगुर महाराज व डाॅ.प्रविण वाघमोडे यांनी जतशहरवासियांना आवाहन केले आहे की, नागरिकांनी शिळे अन्न रस्त्यावर टाकू नये,तसेच प्लॅस्टिक कागद, लोखंडी खिळे व जनावरांना अपाय करतील अशा कोणत्याही वस्तू रस्त्यावर टाकू नयेत असे आवाहन केले आहे.


Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष