जत तालुक्यात आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन
तहसीलदार जिवन बनसोडे यांची माहिती : विविध कार्यक्रमांचे आयोजन
जतवार्ता न्यूज नेटवर्क:
जत तालुक्यात आजपासून पुढील ७ दिवस महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार जिवन बनसोडे यांनी दिली. या ७ दिवसांत तालुक्यातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहामध्ये १ ऑगष्ट रोजी महसूल दिन साजरा करणे महसूल सप्ताह शुभारंभ करण्यात येणार आहे. २ ऑगष्ट रोजी जत येथील तलाठी हॉल येथे युवा संवाद, विविध प्रश्नांवर युवकांशी संवाद साधण्यात येणार आहे. ३ ऑगष्ट रोजी एक हात मदतीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ ऑगष्ट रोजी जनसंवाद, विविध प्रश्नांवर जनतेशी संवाद साधण्यात येणार आहे. ५ ऑगष्ट रोजी जत येथे सैनिकहो तुमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांत माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ६ ऑगष्ट रोजी तहसील कार्यालयात कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद व विविध प्रश्नांबाबत चर्चा होणार आहे. तसेच ७ ऑगष्ट रोजी महसूल सप्ताहाची सांगता होणार असून ७ दिवसांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. नागरिकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार बनसोडे यांनी केले आहे.
यावेळी महसूल सप्ताह शुभारंभ निमित्त आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार बाळासाहेब सवदे, संजय गांधी नायब तहसिलदार अण्णासाहेब धोडमाळ, गट विकास अधिकारी पंचायत समिती जत, पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, विक्रम फाउंडेशन अध्यक्ष युवराज निकम, माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडगव सर्व मंडलाधिकारी, अव्वलकारकून, सर्व तलाठी व कोतवाल कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment