कवठेमहांकाळ येथे जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन

 


जत,प्रतिनिधी:
     ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातही सह्याद्री आदिवासी कर्मचारी असोसिएशन च्या अंतर्गत ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन हा रविवार दि.१३ ऑगस्ट रोजी शाहीदरबार हॉल, कवठेमहांकाळ येथे आयोजित करण्यात आला असून या जागतिक आदिवासी दिनाकरिता सांगली ,सोलापूर ,कोल्हापूर ,पुणे, सातारा या जिल्ह्यातून आदिवास कर्मचारी आपल्या सहकुटुंब येणार असून सांगली जिल्ह्यातील सर्व आदिवासी कर्मचारी बांधवानी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ,असे आवाहन सह्यादी आदिवासी कर्मचारी असोसिएशन सांगली चे अध्यक्ष गंगाराम सलामे, उपाध्यक्ष साळुंखे, सचिव प्रमोद सलामे, कवठेमहांकाळ अध्यक्ष सोनवणे सर, दगडू जोशी, पालवी सर तसेच पुणे विभागीय अध्यक्ष सिताराम भौरले यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष