कवठेमहांकाळ येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

 

जतवार्ता न्यूज नेटवर्क:
      सह्याद्री आदिवासी कर्मचारी असोसिएशन सांगली जिल्हा आयोजित जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात कवठेमहांकाळ येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे,सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य आदिवासी बांधव भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे यांनी सर्व आदिवासी बांधवाना आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पुणे विभागीय अध्यक्ष सिताराम भौरले यांनी आपल्या मनोगतात संघटनेने केलेले कामे सांगितले, संघटना ही एकट्याची नसून सर्व आदिवासी बांधवांची आहे. संघटने बऱ्याच बांधवांना न्याय मिळवून दिला हे सांगितले. प्रमुख अतिथी ठाकरे यांनी आपल्या परखड मनोगतातून व आपल्या समाजाने एकी दाखवली पाहिजे अन्याय सहन न करता आपण प्रतिकार केला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजना तसेच आदिवासी बांधवांसाठी असलेल्या सर्व योजना सरकार बंद पाडत आहे. याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले . तसेच अंकुश मेमाणे यांनी आपली बोली भाषा ,आपली संस्कृती जपली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. तसेच इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
       कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात स्नेहभोजनानंतर आदिवासी संस्कृतीचे जतन करणारे नाशिकहून आलेल्या कलाकारांनी आपल्या आदिवासी नृत्य प्रकाराने प्रेक्षकांची मने जिंकली.
       या कार्यक्रमासाठी पुणे विभागीय अध्यक्ष सिताराम भौरले सर , सांगली जिल्हा अध्यक्ष गंगाराम सलामे साहेब, उपाध्यक्ष इंदरचंद साळूंके साहेब, जिल्हा सचिव प्रमोद ‌सलामे सर , कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अंकुश मेमाणे सर , सोलापूर जिल्हा अध्यक्ष नामदेव मुंडे सर ,  कार्याध्यक्ष श्रीराम पेंदोर, सातारा जिल्हा अध्यक्ष राजु पवारा सर ,शितल भौरले मॅडम,अलका साळूंके मॅडम तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथून मोठ्या संख्येने आदिवासी कर्मचारी बांधव या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .तसेच आदिवासी कवी श्री.अमोल साबळे सर ही उपस्थित होते.त्यांनी आदिवासी दिननिमित्त आकर्षक रांगोळी काढली. कार्यक्रमाची सांगता आदिवासी लोकनृत्याने झाली.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन