माजी सैनिकांसाठी आता संस्था काम करणार



जतवार्ता न्यूज नेटवर्क : 
     जत तालुक्यातील आवंढी येथे माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. माजी सैनिकांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली असून तालुकाभर या संस्थेचा विस्तार केला जाणार असल्याचे संस्थापक/अध्यक्ष ऑन कॅप्टन बबन कोळी, उपाध्यक्ष ऑन सुभेदार मेजर विश्वंभर कोडग यांनी सांगितले.
     यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, माजी सैनिकांनी सेवेत असताना देशसेवा तर केलीच आहे, आता सेवानिवृत्तीनंतर सामाजिक बांधिलकी जपत राजकीयदृष्ट्या देखील काम केले पाहिजे, त्यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मदतच होईल.
      आमदार सावंत पुढे म्हणाले कि, तालुक्यातील प्रत्येक गावात माजी सैनिकांची संघटना स्थापन करुन संघटनेच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आ. सावंत म्हणाले. माजी सैनिक संस्थेच्या आवंढी शाखेच्या नुतन कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर स्वतःच्या फंडातून देण्याचे यावेळी आ.सावंत यांनी जाहिर केले.
    प्रारंभी आ. सावंत व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर संस्थेच्या कार्यालयाचे फित कापून उद्घाटनही करण्यात आले. यावेळी सर्व आजी माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, विर पत्नी, महिला बचत गटाच्या सीआरपी यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भोसले साहेब, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग, भुपेंद्र कांबळे, आवंढी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वंभर कोडग, आवंढी ग्रामपंचायतीच्या सरपंच भिमाबाई कोळी, उपसरपंच आमोल पाटील, सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कोडग, व्हा. चेअरमन सुमन सोळगे, माजी चेअरमन माणिक पाटील, माजी सरपंच आण्णासाहेब कोडग, माजी उपसरपंच संजय एडगे, माजी सैनिक सेवाभावी संस्थेचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष ऑन कॅप्टन बबन कोळी, उपाध्यक्ष ऑन सुभेदार मेजर विश्वभर कोडग,सचिव नायब सुभेदार तात्यासो कोड, खजिनदार हवालदार भाऊसो कोडग, सदस्य बापू बाबर, आण्णासाहेब कोडग, भगवान कोडग, प्रकाश कोडग, महादेव कोडग, आनंदराव कोडग पांडुरंग जाधव व आवंढीसह जत तालुक्यातील आजी-माजी सैनिक व आवंढी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन माजी उपसरपंच प्रदिप कोडग यांनी तर आभार अध्यक्ष बबन कोळी यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष