कॉग्रेस पक्षाच्या वतीने जतमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने आनंद उत्सव साजरा करण्यात आला



जतवार्ता न्यूज नेटवर्क:
      १३ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीत कर्नाटक राज्यातील कोलार येथे प्रचार सभेत राहुल गांधी यांनी निरव मोदी, ललित मोदी यांनी देशाचे कोट्यावधी रुपये बुडवून परदेशात पळून गेले या सर्व चोर लोकांची नावे मोदी कशी आहेत असा प्रचार केल्याने गुजरात सुरत येथील भाजपाचे पूर्णेस मोदी यांनी देशातील सर्व मोदी समाजाची मानहानी झाली म्हणून १६ एप्रिल २०१९ रोजी सुरत कोर्टात याचिका दाखल केल्याने २ मे २०१९ रोजी एफआयआर दाखल झला. १६ जुलै २०१९ रोजी राहुलजी सुरत कोर्टात हजर झाले. पुढे २९ आक्टोंबर २०२१ रोजी सुनवनी झाली. ७ मार्च २०२२ रोजी यांनी उच्च न्यायालयात आपल्याच केसवर स्थगिती आणली. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राहुलजी यांनी गौतम आडनी यांच्या हिंडेन बर्ग रिपोर्ट चौकशी करण्याची मागणी केली. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्णेश मोदी यांनी स्थगिती मागे घेतली. न्यायधीश म्हणून हरिश हसमुख वर्मा यांची बदली कोर्टात झाली. त्वरित सुनावणी होऊन २३ मार्च २०२३ रोजी राहुलजी यांनी दोन वर्षाची शिक्षा दिली म्हणून त्यांचे लोकसभा सदस्यता रद्द केली. २ एप्रिल २०२३ रोजी राहुलजी यांनी महानगर न्यायालयात सुरत येथे अर्ज करुन शिक्षेला स्थगिती मागितली. २० एप्रिल २०२३ रोजी सुरत सत्र न्यायाधीशांनी जामीन मंजूर केला परंतू शिक्षेला स्थगिती दिली नाही. २५ एप्रिल २०२३ उच्च न्यायालयात अपील दाखल केले. ७ जुलै २०२३ रोजी उच्च न्यायालयने अपील फेटाळून लावले. १५ जुलै २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केले. २१ जुलै २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदी यांना नोटीस काढल्या. ४ आगस्ट २०२३ रोजी सर्वोच्चन्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. 
     अशा रीतीने विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी शहा यांच्याकडून होत आहे. ७ सप्टेंबर २०२२ रोजी राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ३५०० किमी १४६ दिवस पद यात्रा काढून देशातील बेरोजगारी, गरबी, महागाई, शेतकरी, कामगार यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांना जनतेकडून प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरल्याने जनतेचे लक्ष हटविण्यासाठी राहूल गांधी यांना निशाना बनवत आहे. मोदी सरकार पैशाने गोदी मिडिया विकत घेऊन मिडिया कडुन मोदी यांचे भ्रमिष्ट प्रतिमा निर्माण करणे व राहुल गांधी यांची प्रतिमा खराब करणे हे काम करण्यात गुंतल्यने जनतेने यांच्या पासुन सावध रहावे. असत्य फार काळ टिकत नाही शेवटी सत्याचे विजय होतो. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदी शहा यांच्या असत्याचा,अहंकार, भ्रष्टाचार,जातीवाद, धर्मांध शक्तिचा पराभव देशातील जनता करील यांत शंका नाही.
     सर्वोच्च न्यायालयाने राहुलजी यांना न्याय देऊन शिक्षेला स्थगिती दिली म्हणून जत शहरातील कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून  पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला. यांवेळी जत तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष  बाबासहेब कोडग, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग उपाध्यक्ष तुकाराम माळी, भुपेंद्र कांबळे, सरदार पाटील, महादेव कोळी, अशोक बन्नेनवर, युवराज निकम, शिवकुमार तंगडी, अण्णा अंगठी,बाळासाहेब तंगडी, मोहनराव मानेपाटील, विकास माने, 
राहुल काळे, राजु यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष