ठोस आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन मागे

रस्ते, पाणी व अन्य मागण्यांसाठी तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली सोन्याळ फाटयावर एक तास रस्ता रोको

जतवार्ता न्यूज नेटवर्क:- 
      जत तालुक्यातील विविध मागण्यांसाठी क्रांती दिनी नऊ ऑगस्ट रोजी जत-उमदी रोडवरील सोन्याळ फाटा येथे सकाळी अकरा वाजता चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक तासाहून अधिक वेळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
     आंदोलनात सोन्याळचे सरपंच बसवराज तेली, माजी उपसरपंच चिदानंद तेली, अंकलगीचे सरपंच परमेश्वर बिरादार, गडदु मुल्ला, विजयकुमार बगली, तंटामुक्तीचे अध्यक्ष विठल बिरादार,  विठ्ठल शिदे, शंकर शिंदे, संगापा पुजारी, कल्लापा शिगे, मुदका नाटीकार, नितिन शिंदे, विश्वनाथ आरळी, अमिन कांबळे, मुकेश बनसोडे, मानव मित्र संघटनेचे सदस्य, कवठेमहांकाळ माजी सभापती अजितराव, सुनिल वाले, अशोक भडक, राजु सरगर, अनिल सरगर, पांडुरंग शिंदे, व्यंकू तेली, सिध्दाणा पुजारी, सोमनिंग पुजारी, चिदानंद काराजनगी,सिद्राम मुंचडी यांच्यासह सोन्याळ,अंकलगी, गारळेवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
       लकडेवाडी - जाडरबोबलाद ते जिल्हा हद्द मारोळी ,  जाडरबोबलाद ते मारोळी, अंकलगी ते करजगी जुना रस्त्याचे डांबरीकरण करावे , तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेक रस्त्यावर बेकायदेशीर विनापरवाना, रस्त्यावर चर काढणे खड्डे पाडणे , गतिरोधक करणे, यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. तरी खड्डे मुक्त रस्ते करावेत, तालुक्यातील ग्रामीण व जिल्हा मार्गावरील काटेरी झुडपे संबंधित ग्रामपंचायत व विभागाने काढावेत, विजापूर ते तीर्थक्षेत्र पंढरपूरला पायी जाण्याचा मार्ग (भाग  सोन्याळ,  गारळेवाडी- २ ) येथे रस्त्यालगत असलेली धोकादायक विहिरीमुळे सदरची वाहतूक बंद होत आहे. सदरच्या विहिरीस संरक्षक भिंत बांधावी. या मार्गावरील बस ही बंद झाली आहे. ती सुरू करावी, गुड्डापूर येथील धानम्मा देवी व मुचंडी येथील दरेश्वर या तीर्थक्षेत्रासाठी हजारो भावीक दर्शनासाठी माडग्याळ जाडर बोबलाद लकडेवाडी मार्गे जातात परंतु या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा या मागणीसाठी तुकाराम बाबा यांनी पुकारलेल्या आंदोलनास ग्रामस्थ व मानव मित्र संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत रस्ता रोको आंदोलनात सहभाग नोंदविला. एक तासाहून अधिक वेळ रस्ता रोको केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक थांबली होती. पोलिसांनी या वाहनांना पर्यायी रस्ता करून दिला.


लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे;
      आंदोलनाची दखल संबंधित विभागाने घेत लेखी आश्वासन दिले. लकडेवाडी जाडरबोबलाद ते जिल्हा हद्द (इत्तर जिल्हा मार्ग क्र. १७७ भाग जाडरबोबलाद ते मारोळी) हा रस्ता नव्याने प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नती झालेला असून पंचायत समिती जत यांचेकडून या कार्यालयाकडे आत्ताच हस्तांतरीत झालेला आहे. तरी माडग्याळ ते लकडेवाडी जाडरबोबलाद व या उपविभागाच्या अखत्यारित असलेले प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग रस्त्यावरील खड्डे भरणे झाडेझुडूपे किरकोळ दुरुस्ती करणेबाबतची निविदा सदय स्थितीत प्रगतीत असून कार्यारंभ आदेश प्राप्त होताच सदर रस्त्यावरील किरकोळ दुरुस्तीची कामे पूर्ण करुन घेण्यात येतील असा लेखी आदेश दिल्यानंतर तुकाराम बाबांनी आंदोलन मागे घेतले. सोन्याळ येथील वगरे तलावात पाणी न सोडल्यास पुन्हा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पत्रकारांशी बोलताना तुकाराम बाबा महाराज यांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष