76व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे 28 ते 30 ऑक्टोबर दरम्यान भव्य आयोजन
प्रतिनिधी;
पुन्हा एकदा दृष्टीगोचर होईल शामियान्यांची सुंदर नगरी, संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथील विशाल मैदानांवर जिथे साकार होईल 28 ते 30 ऑक्टोबर, 2023 दरम्यान 76वा वार्षिक निरंकारी संत समागम आणि दृश्यमान होईल विश्वबंधुत्व आणि वसुदेव कुटुंबकमचे अनुपम स्वरूप.
हा आध्यात्मिक संत समागम सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात भव्य-दिव्य रूपात आयोजित केला जाणार आहे. या पावन संत समागमामध्ये देश-विदेशातील लाखो भाविक भक्तगण सहभागी होऊन संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त करतानाच सद्गुरुचे साकार दर्शव व पावन आशीर्वाद देखील प्राप्त करतील.
या वर्षी निरंकारी संत समागमाचा मुख्य विषय आहे- ”शांती : अंतर्मनातील” असा आहे. या विषयावर देश-विदेशातून सहभागी होणारे गीतकार, कवी, वक्तागण आपले शुभभाव गीत, कविता व विचारांच्या माध्यमातून व्यक्त करतील. विविध भाषांतून केलेल्या या प्रस्तुतींचा आनंद सर्व श्रोत्यांना प्राप्त होईल.
सर्वविदित आहे, की निरंकारी संत समागमाच्या पावन आगमनाची प्रतीक्षा देश-विदेशातील भाविक-भक्तगणांना असते. केव्हा एकदा हा संत समागम येईल आणि त्याचे आपण साक्षीदार बनू असे त्यांना वाटत असते. हा संत समागम निरंकारी मिशनकडून दिला जाणारा सत्य, प्रेम व शांतीचा दिव्य संदेश जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे एक सशक्त माध्यम आहे ज्याद्वारे आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून अवघ्या विश्वामध्ये समानता, सौहार्द व प्रेम यांचे सुंदर स्वरूप प्रदर्शित होते. वर्तमान समयाला याची नितांत गरज आहे.
संत निरंकारी मिशनचा प्रथम संत समागम सन् 1948 मध्ये मिशनचे द्वितिय सद्गुरू शहनशाह बाबा अवतारसिंहजी यांच्या पावन छत्रछायेखाली दिल्लीतील पहाड़गंज येथे संपन्न झाला. त्यानंतर शहनशाहजींनी आपल्या दिव्य प्रेमाद्वारे या संत समागमांच्या श्रृंखलेला गतिमान केले. त्यानंतर बाबा गुरबचनसिंहजी यांनी सहनशीलता व नम्रता यांसारख्या दिव्य गुणांद्वारे त्याला आणखी विस्त़त रूप दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्य मानवी मूल्यांचे जनत व संवर्धन करण्यासाठी बाबा हरदेवसिंहजी यांनी अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिले. परिणामी आज अवघ्या विश्वामध्ये संत निरंकारी मिशनच्या 3485 शाखा कार्यान्वित आहेत. आध्यात्मिकतेची ही दिव्य ज्योत जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी सद्गुरु माता सविंदर हरदेवजी यांनीदेखील अथक प्रयास केले आणि आपले कर्तव्य प्राणपणाने निभावले. वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज ब्रह्मज्ञानाचा हा दिव्य प्रकाश विश्वाच्या कानाकोपऱ्यात एका नवऊर्जेने संचारित करत आहेत.
हा दिव्य संत समागम शांति, समरसता, विश्वबंधुत्व आणि मानवीय गुणांचे एक असे सुंदरी प्रतीक आहे ज्याचे एकमेव लक्ष्य ‘सद्भावपूर्ण एकत्व’ तसेच शांतीची भावना पसरविणे हा आहे.
Comments
Post a Comment