उमदी पोलीस ठाणे हदीतील रमेश खरात टोळी हद्दपार; पोलीस प्रमुखांकडून दोन वर्षासाठी कारवाई
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे करणाऱ्या रमेश खरात टोळीस आगामी गणेश उत्सव व नवरात्र उत्सव अनुषंगाने सांगली व सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रमेश यशवंत खरात (वय २४), तानाजी आमसिद्ध करे (वय २६), संभाजी बिराप्पा शेंडगे (वय २२ रा. सर्व तिकोंडी ता.जत) व महादेव उर्फ पप्पू म्हाळाप्पा करे (वय २० रा. भिवर्गी ता.जत) अशी संशयितांची नावे आहेत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ही कारवाई केली.
संशयित रमेश खरात व त्याच्या सहकार्यानी उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सन २०१९ ते २०२३ या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमवुन घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, घरात घुसुन गर्दी मारामारी करुन मालमत्तेचे नुकसान करणे, बंदी आदेशाचे उल्लंघन करुन दुखापत करणे, बेकायदा बिगरपरवाना गौणखनिज चोरी करणे, महामारीच्या काळात गैरकायद्याची मंडळी जमवून, जिवीतास धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचा संभव असलेली कृती करुन लोकसेवक सार्वजनिक कर्तव्य पार पाडीत असताना त्यास अटकाव करून त्याचेवर बळाचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी बंदी आदेशाचा भंग करुन मारामारी करणे असे गंभीर स्वरुपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे एकुण १९ गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्यांच्यात बदल न होत असल्याने उमदी सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कारवाईचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार चौघांनाही सांगली व सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक, डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सतीश शिंदे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, सिध्दाप्पा रुपनर, पोकों / दिपक गट्टे स्था. गु. अ. शाखा सांगली, तसेच सहा. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, मपोकों / छाया बाबर उमदी पोलीस ठाणे यांनी भाग घेतला.
उमदी परिसरात वेगवेगळ्या गुन्ह्यात त्यांचा सहभाग होता. पोलीस प्रमुखांनी कारवाईबाबत कडक भूमिका घेतली आहे. कोणत्याही गुन्हेगाराची गई केली जाणार नाही. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यास आवश्यक त्या उपाययोजना करू असे त्यांनी सांगितले.

Comments
Post a Comment