श्री संत बागडेबाबा यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्य दुष्काळ निवारण साकडं व भागवत कथेचे आयोजन
गुरुवारी प्रारंभ; रक्तदान शिबिर व वृक्षारोपण मोहीमचे आयोजन; तुकाराम महाराज यांची माहिती
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्य चिखलगी भुयार मठ येथे १४ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण व सायंकाळी सात ते दहा दरम्यान श्रीमत भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी देवाची आळंदी येथील भागवताचार्य शिवाजी महाराज, वटंबे यांच्या उपस्थितीत भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरू होणार आहे. दुष्काळ निवारण साकडंसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रीमंत भागवत कथा ज्ञानज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष संजय धुमाळ, अमृत पाटील महाराज जाल्याळ, काटे महाराज, जवळा, शिवराया हत्तळी रामलिंग मेडीदार , गंगयया स्वामी, पिंटू मोरे, अनिल लोहार आदी उपस्थित होते.
चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ सप्टेंबर रोजी श्रीमद् भागवत महात्म्य, आत्मदेव चरित्र, सुत शौनक संवाद, सहा प्रकारचे प्रश्न, श्री संत नारद पूर्व चरित्र कथा. १५ सप्टेंबर रोजी शुकाचार्य जन्म प्रसंग, परीक्षित राजास सात दिवसांत मरण्याचा शाप,सृष्टी विषयक प्रश्न, श्री विदुर चरित्र, कपिल देव होती संवाद, सती चरित्र कथा, १६ सप्टेंबर रोजी श्री ध्रुवजी चरित्र, श्री प्रभू महाराज चरित्र, पूरंजन आख्यान ऋषभदेव चरित्र, जगभरात चरित्र कथा, आजामील चरित्र कथा, १७ सप्टेंबर रोजी गजेंद्र मोक्ष देवासुर संग्राम, भक्त प्रल्हाद चरित्र कथा, श्री वामन भगवान अवतार प्रसंग, श्रीराम चरित्र कथा व श्रीकृष्ण जन्म महोत्सव,१८ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण बाललीला, पूतना मोक्ष, कालिया मर्दन, वनभोजन, गोवर्धन पूजा, ५६ प्रकारचे भोग गोवर्धन परिक्रमा, १९ सप्टेंबर रोजी रासलीला प्रसंग, उद्धव गोपी संवाद, कंस वध, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह सोहळा, २० सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण परिवार प्रसंग, श्री सुदामदी चरित्र, श्री नारद वमुदेव संवाद, जनक योगेश्वर संवाद, कृष्ण उद्धव समाज, कलियुग महात्मे परीक्षेत राजा मोक्ष कथा समारोप तर २१ सप्टेंबर रोजी स.९ ते ११ श्री भागवताचार्य शिवाजी महाराज, वटंबे यांचे काल्याचे किर्तन व दुपारी १२.३० वाजता श्री संत बागडेबाबा पुण्यतिथीनिमित्य फुल व गुलाल टाकून कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.

रक्तदान शिबिर व वृक्षारोपण मोहीमेचे आयोजन;
श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य २०१० पासून एक एक गाव एक गणपती अभियान राबविणाऱ्या गावांना श्री ची मूर्ती भेट दिली जाते. यावर्षीही हे अभियान राबविण्यात येणार आहे. जत, मंगळवेढा बरोबरच या वर्षीपासून कवठेमहांकाळ तालुक्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी २१ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.
Comments
Post a Comment