जत येथे "साई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल"चे उद्घाटन



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      जत तालुक्यातील रुग्णांना उत्तम सेवा मिळावी याकरिता सर्व सोयीनयुक्त "साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल"चे उद्घाटन प्रथम जगद्गुरु श्री बसव जयमृत्युंजय स्वामीजी (कुडलसंगम) व श्री गुरुमूर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी (कोळे) यांच्या शुभहस्ते व डॉ. रवींद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. जत शहरासह तालुक्यातील गरजू रुग्णांना कमी खर्चामध्ये औषधोपचार व सेवा देण्याचे नियोजन या हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जाणार असल्याची माहिती हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय मंडळाने दिली.
      या उद्घाटन समारंभासाठी खासदार संजय काका पाटील, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, प्रकाश जमदाडे, सुजय उर्फ नाना शिंदे, रमेश पाटील, सुरेशराव शिंदे, आर. के. पाटील, पिराप्पा माळी, आप्पासाहेब नामद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच डॉ.सचिन लकडे, डॉ.रोहन मोदी, डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी, डॉ.महेश पट्टणशेट्टी, डॉ.सागर खाडे, डॉ.मदन बोर्गीकर, डॉ.सचिन वाघ हेही उपस्थित राहणार आहेत. 
      विजापूर रोड, माळी प्लॉट जत या ठिकाणी हॉस्पिटलच्या उद्घाटन समारंभासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे अशी माहिती डॉ. प्रशांत चिकोडी, डॉ. जगदीश माळी व चंद्रकांत गुद्दोडगी यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष