जत न्यायालयात ई फाइलिंग, फॅसिलिटी सेंटरचे उद्घाटन

एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध : वकील, पक्षकारांना लाभ

जतवार्ता न्यूज नेटवर्क;

      बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा व जत बार असोसिएशनतर्फे इ-फाइलिंग फॅसिलिटी सेंटरचा प्रारंभ महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे चेअरमन अँड. विवेकानंद घाडगे व माजी चेअरमन अँड. मिलिंद थोबडे, जत बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. शिवशंकर खटावे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जत न्यायालयाचे क. न्यायाधीश ए.को. चोगुले, सहदिवाणी न्यायाधीश ए. बी. जाधव, उपाध्यक्ष अँड.राजकुमार म्हमाणे, अँड.सचिव सागर व्हनमाणे उपस्थित होते.

     भविष्यातील ई-फाइलिंगचे महत्त्व तसेच वकील, पक्षकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व नवोदित वकिलांच्या हितासाठी बार कौन्सिल प्रयत्नशील असल्याचे अॅड. विवेकानंद घाटगे यांनी सांगितले. जिल्ह्यात मिरज पाठोपाठ जत येथे इ-फायलिंग सुरू झाल्याबद्दल घाटगे यांच्या संघटनेतर्फे अभिनंदन करण्यात आले. इ-फायलिंग सुविधेचा वकील पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

       यावेळी सर्व वकील व पक्षकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड