उसाच्या शेतीत गांजाची लागवड; एकास अटक



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
        जत तालुक्यातील बाज येथे उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. बागेतून १९ किलो ओला गांजा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत १ लाख ९१ हजार इतकी आहे. या प्रकरणी शेतकरी बाबू पांडुरंग खरात (वय५२) यास पोलिसांनी अटक केली आहे. जत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली.
      याबाबत अधिक माहिती अशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांना एका खबऱ्याकडून बाबू खरात या शेतक-याच्या ऊस शेतीत गांजाची झाडे लावल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलिस अधीक्षक तुषार पाटील व उप विभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान घुगे, हवालदार विजय अकुल, सुनील व्हनखंडे, कॉन्स्टेबल सरगर, संतोष चव्हाण, विनोद सकटे, वाहन चालक अजित मदने, आदींनी बाज येथे सापळा रचून खरात यांच्या शेतात छापा टाकला.
दरम्यान, छाप्यात १९ किलो १०० ग्राम गांजाची झाडे आढळली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून रात्री उशिरा संशयित बाबू खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष