जत, कवठेमहांकाळ व मंगळवेढा तालुक्यात एक गाव एक गणपती अभियान राबविणाऱ्या गावांना तुकाराम बाबा देणार श्री ची मूर्ती भेट
मानव मित्र संघटनेकडे १२ सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करा; प्रशांत कांबळे, अजित कारंडे, रामचंद्र रणशिंगे यांचे आवाहन
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावांना श्री च्या मुर्त्या मोफत भेट देणार आहेत. जत कवठेमहांकाळ व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे तेव्हा मंडळांनी श्री संत बागडेबाबा मानव मित्राकडे येत्या १२ सप्टेंबरपर्यत नाव नोंदणी करावी असे आवाहन जत येथील श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, रामचंद्र रणशिंगे व कवठेमहांकाळचे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे अजित कारंडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
प्रशांत कांबळे, अजित कारंडे रामचंद्र रणशिंगे म्हणाले, राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य २०१० पासून तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावासाठी श्री च्या मुर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. मंगळवेढा नंतर २०१९ पासून जत तालुक्यात 'एक गाव एक गणपती' राबविणाऱ्या गावांना श्री ची मोफत मूर्ती भेट देण्याचा अभिनव उपक्रम तुकाराम बाबांनी सुरू केला. यावर्षीपासून कवठेमहांकाळ तालुक्यात हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. गावात एकोपा, सलोखा वाढावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बाबांनी एक गाव एक गणपती राबविण्याचे आवाहन गावकऱ्यांना प्रत्येक वेळी केले. ज्या गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला त्या गावाला बाबांनी श्री ची मूर्ती भेट देत त्यांना प्रोत्साहन दिले. मागील १३ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.
दुष्काळ, कोरोना, महापूर, अपघात असो की कोणतीही नैसर्गिक आपत्ती, घटना तुकाराम बाबा यांनी कायम मदत नव्हे कर्तव्य म्हणून निस्वार्थ कार्य केले आहे. तुकाराम बाबा यांचा जतच्या पाण्यासाठीचा संघर्षही जतकरांना माहीत आहे. जतच्या जनतेच्या हितासाठी कायम तत्पर असलेल्या तुकाराम बाबा यांच्या कार्याला, उपक्रमाला जतकरांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी प्रशांत कांबळे यांनी केले.

गणेशोत्वाचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांना द्या- तुकाराम बाबा
पावसाने दडी दिल्याने जत तालुक्यात सध्या भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा व पाण्यासाठी जतकरांना संघर्ष करावा लागत आहे तेव्हा अशा कठीण परिस्थिती वेळी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील गावांनी एक गाव एक गणपतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. हा अभिनव उपक्रम प्रत्येक गावांनी राबवून एक नवा इतिहास घडवावा. या उत्साहावर होणारा खर्च टाळून ती रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी, विद्यार्थ्यांसाठी खर्ची करावी असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Comments
Post a Comment