तुकाराम बाबांच्या संकल्पनेतून विवाह सोहळयात ५०० वृक्षांचे वाटप; संख येथील फुटाणे (सर) परिवारांचा उपक्रम
जतवार्ता न्यूज नेटवर्क:-
कोरोनाचा कठीण काळ आठवा म्हणजे आपणास ऑक्सिजनचे महत्व समजून येईल. कोरोना अद्याप गेलेला नाही नव्या रुपात तो पुन्हा येतोय. कोरोना काळात जे घडले ते पुन्हा घडू नये यासाठी स्वच्छ हवा व सुंदर परिसर करण्यासाठी प्रत्येकांनी एक झाड लावून ते जतन केले तरच हे शक्य होणार आहे तेव्हा प्रत्येकांनी वृक्ष लागवड करावी असे आवाहन चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले.
जत तालुक्यातील संख येथील श्री संत बागडेबाबा मंगल कार्यालयात रविवारी अनोखा विवाह सोहळा पार पडला. हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळयात वर्हाडी मंडळींना ५०० वृक्षांचे वाटप करण्यात आले. या विवाह सोहळयाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
संख येथील बसवराज फुटाणे सर यांचे चिरंजीव अजय यांचा विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यात हभप तुकाराम बाबा यांनी फुटाणे परिवारांना अनावश्यक खर्चाला फाटा द्या व लग्नात आलेल्या सर्वांना विविध वृक्ष वाटप करू अशी संकल्पना मांडली. हभप तुकाराम बाबा महाराज यांची ही संकल्पना अंमलात आणत फुटाणे परिवाराने वड, चिंच, उंबर, पिंपळ आदी झाडे विवाह सोहळ्यात आलेल्या सर्वांना देत झाडे जतन करा असे कळकळीचे आवाहन पै- पाहुणे, मित्र मंडळींना केले. यावेळी हभप तुकाराम महाराज यांच्यासह गुडडापूर येथील हिरेमठ संस्थानचे गुरुपाद शिवाचार्यश्री दानम्मा गुरुपाद शिवाचार्य, माजी सभापती आर. के. पाटील, तम्मणगौडा रविपाटील, संखचे उपसरपंच सुभाष पाटील, आरटीओ अशोक पाटील, डॉ. पवार, श्रीकांत पाटील, तम्माण्णा बागेळी, अब्बास सय्यद, राजेंद्र कननुरे, आय. एम. बिरादार, वाली सर, विजय बिराजदार, चनप्पा अवटी, गंगय्या स्वामी,अनिल लोहार, सलीम अपराद, बसू बिरादार,रविनाथ , समर्थ राठोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले, फुटाणे परिवाराने एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आनंदाच्या क्षणी आपला तर आनंद त्यांनी दिगणित केलाच त्याचबरोबर एक सामाजिक संदेशही त्यांनी दिला आहे. दुष्काळ व कोरोना सारखी आपत्ती आली की आपले डोळे उघडतात मग झाडाचे महत्व कळते. काळ येण्याअगोदर सावध व्हा व स्वतःला सामाजिक कार्यात झोकून द्या, आयुष्यात कर्म चांगले ठेवा असे आवाहन केले.

फुटाणे परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक;
हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या अकल्पनेतून साकारलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी मनापासून कौतुक केले. दिलेले झाड नक्की अंगणात, बांधावर लावू अशी ग्वाही देत सर्वजण फुटाणे परिवाराला विवाहानिमित्य शुभेच्छा देत होते.
Comments
Post a Comment