राजे रामराव महाविद्यालय व विवेक बसव प्रतिष्ठान,जत यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने राजे रामराव महाविद्यालय,जत येथे विवेक-बसव प्रतिष्ठान व राजे रामराव महाविद्यालय, जत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरा संपन्न झाले. प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अशोक बोगूलवार, प्रा.महादेव करेनव्वर, डॉ.अप्पासाहेब भोसले, प्रा.कृष्णा रानगर व प्रा.कुमार इंगळे यांच्या हस्ते उपस्थित टीमचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मयुरेश्वर हॉस्पिटल व विवेक-बसव प्रतिष्ठान चे समन्वयक डॉ.शालिवाहन पट्टणशेट्टी यांनी शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना व ताणतणावाचे मनावर ओझे असताना आरोग्य निरोगी कसे ठेवावे हे समजावून सांगितले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनींचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये जनरल चेकअप, बी.पी., शुगर व ऑक्सिजन पातळी व ए.सी.जी.करुन -हदयाची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुरेश्वर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.शालीवाहन पट्टणशेट्टी, ए.सी.जी. टेक्निशियन शहानवाज कलादगी, डॉ.निशा जमशेट्टी, डॉ.पवित्रा माळी, सहायक सचिन ऐवळे, लॅब टेक्निशियन दिलीप व्हनखंडे, सहाय्यक अनिल पटेद व अमोल तुराई यांनी सर्वांची आरोग्य तपासणी केली. यानंतर प्रमुख डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी यांनी तपासणी करुन पुढील उपचार सांगितले.
यावेळी डॉ. शालिवाहन पट्टणशेट्टी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना येणा-या ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे व आपले आरोग्य निरोगी कसे ठेवावे या विषयी मार्गदर्शन करुन आपले आरोग्य हिच आपली संपत्ती आहे हे सांगीतले. हि आरोग्य तपासणी यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.अशोक बोगूलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.तुकाराम सन्नके, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाल, प्रा. उमेश कौलगे व प्रशासकीय कर्मचारी बापू सावंत व आबा शिरगिरे यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment