सिद्धार्थ संकुल येथे सिद्धार्थ फेस्टिवल, व्याख्यानमाला व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन; डॉ. कैलास सनमडीकर



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी व श्री.उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाउंडेशन, जत यांच्या संयुक्त विद्यामाने दरवर्षी प्रमाणे "सिद्धार्थ फेस्टिवल" अंतर्गत राजर्षी छ. शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
    जत तालुक्याचे भाग्यविधाते कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर(काका) यांनी गोरगरीब ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे या करिता जतमध्ये आश्रमशाळा सुरु करून सामाजिक, राजकीय कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात आपले पाऊल टाकले. आज अखेर त्यांनी आश्रमशाळा, सी.बी.एस.सी.स्कूल, पॉलीटेकनिक कॉलेज, नर्सिंग कॉलेज सुरु केले आहेत.
     विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच थोर समाजसुधारक, साहित्यिक, विचारवंत यांच्याबद्दलची माहिती, त्यांचे विचार ऐकावयास मिळावे. तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आजअखेर श्री.द.मा. मिराजदार, श्री. रामदास फुटाणे, श्री. वामन व्होवाल, श्री. श्रीमंत कोकाटे, श्री. गंगाधर बनबरे, श्री. रवी बजंत्री यासारखे बरेच वक्ते कार्यक्रमास लाभले होते.
     सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दि.20/01/2024 ते दि.21/01/2024 रोजी "राजर्षी छ. शाहू महाराज स्मृती व्याख्यानमाला तसेच विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानमालेसाठी व्यक्ते म्हणून प्रा.प्रकाश बाळू नाईक हे लाभले आहेत.
     तरी जत मधील सर्व नागरिकांनी सिद्धार्थ संकुल, वळसंग रोड, जत येथे वरील आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन डॉ. सौ.वैशाली सनमडीकर आणि संस्थेचे सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांनी केले आहे.



Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन