जतमध्ये विक्रम फौंडेशनकडून महिला सबलीकरण मेळावा व मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन


विक्रम फौंडेशनचे युवराज निकम व राजेंद्र माने यांची माहिती


जतवार्ता न्यूज नेटवर्क
    महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री स्व.डॉ.पतंगरावजी कदम यांच्या जयंती निमित्त  व डॉ. विश्वजित कदम माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फौंडेशन जत यांचे वतीने महिला सबलीकरण मेळावा व गरजू रुग्णासाठी भारती हॉस्पिटल सांगली यांचे वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करणेत आल्याची माहिती विक्रम फौंडेशनचे युवराज निकम व राजेंद्र माने यांनी दिली.
    या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि.२५ जानेवारी २०२४ रोजी भारती विद्यापीठ मुलींचे वसतिगृह जत येथे सकाळी ९ ते सायं. ४ या वेळेत करणेत आले आहे. महिला सबलीकरण मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारे सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकथनकार प्रा.अप्पासाहेब खोत व उदय माळी जिल्हा संसाधन अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.तृप्ती धोडमिसे भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील व आ.विक्रमसिंह सावंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात जत तालुक्यातील कर्तुत्ववान महिलांचा व उल्लेखनीय काम केलेल्या महिला बचत गटांचा सन्मान करणेत येणार आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांना शासकीय योजनांची माहिती देणारे व विविध बचत गटांचे स्टोल उपलब्ध असणारे आहेत.
    तसेच भारती हॉस्पिटल सांगली यांचे वतीने घेणेत येणाऱ्या सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. तरी सर्व महिला भगिनी व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवराज निकम आणि राजेंद्र माने यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड