शाकंभरी पोर्णीमेनिमित्त श्री.स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
   जत शहरातील राजे रामराव महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज नगर या ठिकाणी श्री.स्वामी समर्थ महाराजांचे भव्य असे मंदिर असून श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत च्या वतीने मंदिरात वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
   श्री.स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत चे अध्यक्ष श्री. बापूसाहेब पवार,उपाध्यक्ष श्री.अशोक तेली,सचिव श्रीकृष्ण पाटील, दिपक पाटणकर, गणेश सावंत, लक्ष्मण मोरे,मोहन पवार, नारायण पवार,राघव जोशी,सदाशिव जाधव, डी.बी.जाधव, अतुल मोरे,वसंत उगळे,आदी स्वामी भक्त दर पोर्णीमेला विविध कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे आयोजन करतात.
   आज गुरुवारी शाकंभरी पोर्णीमेनिमित्त श्री.स्वामी समर्थ मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती.तसेच पहाटे श्री.स्वामी समर्थ महाराजांची अभिषेक पूजा तसेच महाराजांच्या पाठीमागील बाजूस असलेली मखर विविध भाज्यांनी सजविलेली होती.
   सकाळी दहा ते बारा या वेळेत रामपूर येथील विरशैव भजनीमंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.त्यानंतर दुपारी येथील अंबिका नवरात्र उत्सव मंडळ जतचे अध्यक्ष श्री.शहाजीबापू भोसले यांच्याहस्ते श्री.स्वामींची आरती करण्यात येऊन स्वामी चरणांवर पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व श्री.स्वामी भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
   शाकंभरी पोर्णीमेनिमित्त जत नगरिची ग्रामदेवता,लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.यल्लमादेवी व डोंगरनिवासिनी श्री.अंबाबाई मंदिर येथे देवीची मनमोहक व अकर्षक अशी पूजा बांधून अकर्षक अशी आरास केली होती.



Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जत विधान सभा ताकतीने लढू; सागर शिनगारे

शिवकुमार तंगडी यांची जत तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड