आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष


फटांक्यांची जोरदार अतिशबाजी व भगव्या रंगाची उधळण करित साजरा केला विजयोत्सव


जतवार्ता न्यूज नेटवर्क:
    मराठा समाजाचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे-पाटील यांच्या संघर्षामुळे मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळाल्याचे राज्यसरकारने शासन परिपत्रकाव्दारे जाहीर केल्याने त्याचा विजयोत्सव सकल मराठा समाजाने भगव्या रंगाची उधळण करित साजरा केला.
   मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योध्दे  जरांगे-पाटील हे गेले कित्येक महिने संघर्ष करित होते. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात समाजजागृती करण्याचे काम केले. त्यांना सर्वत्र समाजबांधवांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. तरिही राज्यसरकार मराठा समाजाला अरक्षण देण्याकडे चालढकल करताना दिसत होते.
   त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योध्दे जरांगे-पाटील यांनी जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी ते मुंबई असा लाखो समाजबांधवाना सोबत घेऊन न भूतो न भविष्यती असा मोर्चा काढून सरकारची सर्व बाजूनी कोंडी केली.
   मनोज जरांगेंच्या या आक्रमकपणामुळे राज्य सरकारने नमते घेत आज वाशी मुंबई येथून मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे ,ना.गिरिश महाजन तसेच मराठा संघर्ष योध्दे मनोज जरांगेपाटील यांना ज्यूस देऊन त्यांना अमरण उपोषण सोडण्यास सांगीतले व तुमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून तसा शासन आदेशही मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी जरांगे यांना दिल्याने उपस्थित लाखो समाजबांधवांनी मोठा जल्लोश करित गुलालाची उधळण करित फटाक्यांच्या अतिषबाजीत आपला विजयोत्सव साजरा केला.
    त्याचाच विजय म्हणून आज जत येथील सकल मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयाच्या घोषणा देत मराठा समाजाला ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळाल्याबद्दल विजयोत्सव साजरा केला.
    यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, संग्राम पवार, विक्रमसिंह सावंत फाऊंडेशन जतचे अध्यक्ष युवराज निकम, मराठा स्वराज्य संघाचे जिल्हाध्यक्ष अँड. रणधिर कदम, शिवसेना जत शहराध्यक्ष विजय चव्हाण, काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष मोहन माने-पाटील, सुधिरदादा चव्हाण, मेजर बिसले, सुनिल चव्हाण, सचीन शिंदे, अनिल शिंदे, गणेश सावंत, अरूण शिंदे, कैलास गायकवाड, श्रीकृष्ण पाटील, पै.पांडुरंग सावंत, तानाजी काशीद, रवी घाडगे, शहाजीबापू भोसले, बनाळीचे उपसरपंच मंगेश सावंत, प्रविण जाधव, मदन जाधव, अरूण शिंदे, मधुकर शिंदेसर, नाना कोडग, अजिंक्य सावंत, पिंटू खानविलकर, अमर जाधव ,धर्मराज माने, दत्ता भोसले, सुमंत भोसले,।संदीप शिंदे, रमेश पवार आदींसह शेकडो मराठा समाज बांधवानी जत शहरातील प्रमुख मार्गावरून पदयात्रा काढली. चौका चौकात फटांक्यांची जोरदार अतिशबाजी व भगव्या रंगाची उधळण करित आपला विजयोत्सव साजरा केला.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन