महादेव हुचगोंड यांचा रिपाई मध्ये जाहीर प्रवेश
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जत तालुका विधानसभा प्रमुख महादेव हुचगोंड हे सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रात काम करत असताना अत्यंत तळमळीने काम करणारे कार्यकर्ते असून महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना गोरगरीब वंचित जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच जत तालुक्याचा पाणी प्रश्न शेतकऱ्यांची कर्जमाफी, बँकांची, कर्ज वाटप बाबतचे चुकीचे ध्येय धोरण, बेरोजगारांना उद्योग निर्मिती व रोजगार निर्मिती याबाबत वेळोवेळी आंदोलन केले असून ते तळमळीचे कार्यकर्ते आहेत. हुचगोंड यांनी रिपाई मध्ये त्यांच्या अनेक समर्थकांच्या सोबत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका विधानसभा प्रमुखपदाची जबाबदारी मी सोपवत असल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष संजयराव कांबळे म्हणाले.
यावेळी बोलताना हुचगोंड म्हणाले की, गोरगरीब जनता, वंचित घटक, शेतकरी, दिव्यांग यांचेसाठी मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. या सर्व वंचित घटकांच्या साठी गेली कित्येक वर्षे तळमळीने व प्रामाणिकपणे काम करणारा एक अभ्यासून नेता म्हणून माझ्या नजरेसमोर संजय कांबळे असल्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीला प्रभावित होऊन मी रिपाई मध्ये जाहीर प्रवेश केला असून इथून पुढील काळात संजयराव कांबळे आदेश देतील त्याप्रमाणे पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीन व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदास आठवले यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवून रिपब्लिकन पार्टी वाढवण्याचे काम करीन असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
जत तालुका विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीचे पत्र जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले. यावेळी महादेव माने, सदाशिव कैकाडी, राजाराम साळुंखे, रामू कलमडी, तालुका कार्याध्यक्ष विनोद कांबळे आदीजन उपस्थित होते.

Comments
Post a Comment