कायद्या हा सर्वांसाठी समान असतो; एपीआय वैभव मारकड


  
जतवार्ता न्यूज नेटवर्क; 
    बहुतांश कायदे जरी महिलांच्या बाजूने असले तरी कायद्यासमोर महिला आणि पुरुष समान आहेत. कायद्याचा गैरवापर केल्यास त्याच कलमाने गैरवापर करण-यास शिक्षा होते, असे प्रतिपादन जत पोलीस स्टेशन चे एपीआय श्री.वैभव मारकड यांनी केले. 
     ते राजे रामराव महाविद्यालयाच्या अग्रणी महाविद्यालय योजना, ग्रंथालय, भाषा विभाग, महिला सबलीकरण कक्ष, अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व जत पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'महिला संरक्षण व सुरक्षा: काळाची गरज '  या विषयावर मुक्तपीठ येथे आयोजित खुल्या चर्चेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे होते.
     यावेळी जत पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक राजश्री गायकवाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज मुली मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. शिक्षण घेत असताना मुलींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. पण कायद्याच्या माहिती अभावी त्याविषयी त्या बोलत नाहीत. कायद्याने महिलांना अनेक अधिकार दिलेले आहेत. त्याचा विधायक वापर महिलांनी करावा व आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडावी. पोलीस प्रशासन नेहमीच त्यांच्या सोबत असेल, असेही त्या म्हणाल्या.
     या खुल्या चर्चेच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.सुरेश पाटील म्हणाले की,  मुक्तपीठ हा विद्यार्थ्यांसाठी खुला मंच आहे. या मंचाचा एकमात्र उद्देश विद्यार्थ्याने बोलते व्हावे हा आहे. महिलांना देशाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आणण्यासाठी महिला संरक्षण सारख्या विषयावर चर्चा होणे गरजेची आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या खुल्या चर्चेचे सूत्रसंचालन प्रा.धनंजय वाघमोडे यांनी, प्रास्ताविक डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी तर आभार डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी मानले. या कार्यक्रमास अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.एच.डी.टोंगारे, डॉ.संगीता देशमुख, प्रा.अभकुमार पाटील,डॉ.भिमाशंकर डहाळके, डॉ.शंकर गावडे, डॉ.अशोक बोगुलवार, प्रा.नवनाथ लवटे, प्रा.कुमार इंगळे, प्रा.रेश्मा लवटे, प्रा.तुकाराम सन्नके, प्रा.लता करांडे, प्रा.अनुप मुळे आदींसह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष