अंकलगीत म्हैसाळच्या पाण्याचे पूजन करून ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू; तुकाराम बाबा महाराज, विजयकुमार चिप्पलकट्ट यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत पूर्व भागातील अंकलगी येथील दोन्ही तलाव कोरडेठाक पडले आहेत. गावावर दुष्काळाची भिषण छाया पडली आहे. अंकलगी गावाला तात्काळ मदत करावी तसेच विस्तारित योजना मार्गी लावावी या मागणीसाठी अंकलगी ग्रामस्थांनी सोमवारपासून गावातील महादेव मंदिरासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज, उद्योगपती विजयकुमार चिप्पलकट्टी यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी अंकलगी येथील कुमार उदगेरी, सोमनाथ मैत्री, बुजरीकरसो मुल्ला, बिराप्पा कोहळळी, शिवनिंगप्पा तेली, काडाप्पा मैत्री, शंकर वाघोली, अर्जुन वालीकर, अनिल उदगेरी, रमेश जत्ती, श्रीशैल कोळी, सिद्धराम गुरव, राम चौगुले, गोपाळ माळी, सिद्धप्पा तेली, भिमुगौड बिरादार, चंद्रकांत नरुटे, महादेव बगली, शिवाजी साळुंखे, साहेबगौंड पाटील, भिमु पाटील, भिमराव काखंडकी यांच्यासह ग्रामस्थ उपोषणात मोठया संख्येने सहभागी झाले होते.
तुकाराम बाबा महाराज, उद्योगपती विजयकुमार चिप्पलकट्टी यांच्यासह उपोषणात सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या हस्ते म्हैसाळ पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करून उपोषणास सुरुवात करण्यात आली. शासन व प्रशासन अंकलगीसह जत पूर्व भागाला पाणी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत विजयकुमार चिप्पलकट्टी म्हणाले की, २०१९ पासून आम्हास जत पूर्व भागातील ६५ गावांना पाणी देणार, पाणी येणार असे सांगितले गेले व आज पाच वर्षे झाली तरी अंकलगी येथे पाणी पोहचू शकले नाही. ज्या अंकलगी गावात विस्तारित म्हैसाळ योजनेचा श्री गणेशा झाला, ज्या गावात पाणी मिळावे म्हणून उठाव झाला तेच गाव आज पाण्यापासून वंचित असल्याची खंत विजयकुमार चिप्पलकट्टी यांनी व्यक्त केले.
तुकाराम बाबाही उतरले आंदोलनात;
जत पूर्व भागातील पाण्यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी, पाणी परिषदा, आंदोलने, मोर्चे, आजी, माजी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री, म्हैसाळचे अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावे करणारे तुकाराम बाबा हे अंकलगी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी गेले. उपोषणस्थळी त्यांच्या हस्ते म्हैसाळने भरलेल्या पाण्याच्या कलशाचे पूजन करण्यात आले. त्यावेळी बोलताना तुकाराम बाबा यांनी शासन, प्रशासनाकडून सुरू नसलेल्या दिशाभूलचा जाहीर निषेध करत आपण अंकलगी ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे तर पाण्यासाठी आमरण उपोषण करण्यास याठिकाणी आल्याचे सांगत उपोषणस्थळी ठाण मांडले.

Comments
Post a Comment