संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन



जत/प्रतिनिधी : माजी सैनिक वेलफेअर असोशिएशन, जत तालुका व आजी माजी सैनिक कल्याण संघटना जत यांचे वतीने गुरुवारी दि.२९ रोजी सैनिकांचा महामेळावा तुकारामबाबा महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा कल्याण सैनिक अधिकारी लेप्ट कर्नल भिमसेन चवदार हे उपस्थितीत राहणार असल्याची माहिती माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बबनराव कोळी, उपाअध्यक्ष शुभेदार मेजर सिध्दु गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
   मेळाव्यास उप विभागिय अधिकारी अजितकुमार नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, जत तहसिलदार जीवन बनसोडे, संख अप्पर तहसीलदार सुधाकर मागाडे, ह.भ.प तुकामबाबा महाराज, जत पोलिस निरीक्षक सुरज बिजली, उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपस्थिती राहणार आहेत.
   आजी, माजी सैनिकांच्या अडीअडचणी, समस्या यावर चर्चा होणार आहे. तरी सर्वांनी सकाळी १० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
    यावेळी विजय कुरणे, बाळासाहेब दादासाहेब भोसले, आर.ए.स्वामी, आकाराम बिसले, भाऊसाहेब पाटील, दिपक खांडेकर, सतिश शिंदे, नानासाहेब कुटे, अब्बास सैय्यद, धानाप्पा बिराजदार, आकाराम गायकवाड, सजय धुमाळ, चन्नाप्पा आवटी उपस्थित होते.

तालुक्यातील पहिलाच मेळावा ह भ प तुकाराम बाबा महाराज;
   आजपर्यंतच्या काळात जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यामध्ये आजी, माजी सैनिकांच्या अडीअडचणी, समस्या यावर चर्चा होणार आहे. या महामेळाव्यास तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन चिखलगी मठाचे मठाधिपती ह भ प तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखण्यावर भर; शाखा विस्ताराचे नियोजन

जत येथील स्वामी समर्थ मंदिराचा चतुर्थ वर्धापणदिन मोठ्या उत्साहात साजरा

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन