म्हैसाळच्या पाण्यासाठी संख येथे २२ जुलै रोजी रस्ता रोको व आमरण उपोषण..हभप तुकाराम बाबा महाराज यांची माहिती
जतवार्ता न्यूज नेटवर्क:
जत तालुक्यातील माडग्याळ येथे म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. ते पाणी व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी संख (ता.जत) येथे २२ जुलैपासून रक्त घ्या, पण पाणी द्या आंदोलन, आमरण उपोषण व रास्ता रोको करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिली आहे.
माडग्याळ येथे दाखल झालेले पाणी व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी अंकलगी येथे ७५हून अधिक तरुणांनी रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत रक्तदान केले. तीन दिवस उपोषण केले. त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले. येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही.
सहा महिने झाल्यानंतर जून महिन्यात तुकाराम महाराज यांनी २२ जुलैपर्यत म्हैसाळचे पाणी न आल्यास संखसह जत पूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन, आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन व मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केला आहे.
त्यापत्रानुसार कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी आम्हाला पत्र दिले. या पत्रात कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत प्रकल्पाच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये म्हैसाळ योजनेच्या जत शाखा कालवा किमी ३ मधुन बंदिस्त नलिका प्रणाली प्रस्तावित करण्यात आलेली असून त्यानुसार माडग्याळ, व्हसपेठ, गुड्डापूर तलाव (संख नाला भरण), अंकलगी नाला ई. कामांचा समावेश केला आहे.
त्याप्रमाणे कामाच्या अंदाजपत्रकास दि. २२ फेब्रुवारीला तांत्रिक मान्यता दिली आहे. अशी माहिती पत्रान्वये ह.भ.प तुकाराम महाराज यांना कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी दिली आहे.
परंतु पाणी कधी देणार याची माहिती दिली नाही. शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही. त्यामुळे पाण्यासाठी संख येथे सोमवार दि.२२ रोजी आंदोलन होणार आहे.
यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले, वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या जत पूर्व भागातील माडग्याळ येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी व्हसपेठ, गुडडापूर, संख, अंकलगी तलावात पोहचू शकते. या मागणीसाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण केले.
त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले. येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले. आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही.
शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही. हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा येत्या सोमवार दि.२२ रोजी संख येथे रस्ता रोको आंदोलन, पुन्हा एकदा रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करणार आहे. आम्हाला पाणी देणे शक्य नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली.
Comments
Post a Comment