२९ जुलै धनगर समाजाचा "विश्वासघात दिवस"; दहा वर्षाचा धनगर आरक्षणाचा प्रवास वेदनादायी; विक्रम ढोणे

शिंदे फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळाला नाही. सरकारने धनगर एसटी आरक्षणाकडे गांभीर्याने न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा; संयोजक धनगर विवेक जागृती अभियान महाराष्ट्र राज्य विक्रम ढोणे यांनी दिला.



जतवार्ता न्यूज नेटवर्क;
    भाजप शिवसेनेने २०१४ साली धनगर समज्याला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन देऊन धनगर समाजाचा विश्वासघात केला या घटनेला १० पूर्ण झाले असल्याने निषेध व्यक्त करीत धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून जत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
    २९ जुलै २०१४ साली बारामती येथे धनगर समाज्याचे आंदोलन चालू होते त्या आंदोलनाला पाठींबा देत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समज्याला विश्वास दिला आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढतो राज्यातील धनगर समाज्याने भाजप शिवसेनेला एकहाती सत्ता दिली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील धनगर समाजाला आनंद झाला आणि धनगर आरक्षण प्रश्न सुटणार असा विश्वास निर्माण झाला पण तिथेच धनगर सामज्याचा विश्वासघात झाला आहे. दहा वर्षे दिशाभूल करून वेळकाढूपणा करण्यात राज्य सरकार नियोजन करीत असते.
    धनगर समाजाची एसटी (अनुसूचित जमाती) आरक्षणाची असताना देवेंद्र फडणवीस सरकारने टीस ची अभ्यास समिती नेमून वेळकाढूपणा केला.त्यानंतर लोकसभा निवडणूक तोंडावर असताना १ हजार कोटीची घोषणा केली पण प्रत्यक्षात आजही त्याची तरतूद केली नाही. त्यानंतर आरक्षण मिळेपर्यंत जे आदिवासींना ते धनगरांना अशा लोकप्रिय घोषणा करीत समाज्याची दिशाभूल करीत राहिले. त्यानंतर न्यायालयात सरकारने सकारात्मक प्रतिज्ञापत्र दिले म्हणून २०२४ च्या लोकसभा आचारसंहिता पर्यंत दिशाभूल केले आणि प्रत्यक्षात जे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले त्याचा धनगर आरक्षण प्रश्नांवर फायदा होण्याऐवजी धनगर समाजाचा तोटा झाला हे सिद्ध झाले आहे.आता शिंदे समिती नेमून पुन्हा वेळकाढूपणा करीत आहे. हा सर्व धनगर आरक्षणाचा प्रवास वेदनादायी आहे.
    त्यामुळे शिंदे, फडणवीस, पवार सरकारने धनगर समाज्याचा विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे पहिल्या कॅबिनेट मध्ये नाही किमान दहा वर्षातील शेवटच्या कॅबिनेटमध्ये तर हा प्रश्न सोडवावा अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल आणि विश्वासघात केलेल्या भाजपला राज्यातील धनगर समाज माफ करणार नसल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितले. यावेळी जत तालुका धनगर समाजाचे युवक जयाप्पा खरात, अशोक सलगर, तानाजी कटरे, विलास काळे, प्रशांत कटरे, पांडुरंग खरात, संतोष खरात, धोंडीबा खरात, अशोक आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष