भित्तिपत्रिकेतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते; कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत

मराठी विभागाच्या वतीने प्राचीन व आधुनिक साहित्यिकांवर भित्तिपत्रिकेचे उद् घाटन


जतवार्ता न्यूज नेटवर्क;

    महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कला कौशल्यांना संधी मिळावी, तसेच लेखन कौशल्य क्षमता विकसित होण्यासाठी व विचारांना चालना देण्यासाठी भित्तिपत्रिका हे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत यांनी केले.
    ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभागाने आयोजित केलेल्या भित्तिपत्रिकेच्या उद् घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र एन.सी.सी 16 बटालियन हवालदार दिपक खामकर प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून भित्तिपत्रिका घेण्यामागील उद्देश स्पष्ट करून सांगितला.
    यावेळी पुढे बोलताना कॅप्टन प्रा.पी.ए.सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मनातील भावनेला शब्दांच्या रूपाने वाट मोकळी करून देण्यासाठी भित्तिपत्रिका हे प्रभावी माध्यम आहे. मराठी विभागाने भित्तिपत्रिकेच्या माध्यमातून प्राचीन व आधुनिक लेखक व कवयत्रिंची माहिती करुन दिली. प्रारंभीच्या कालखंडात ज्या ज्या लेखक कविंनी मराठी भाषेची सेवा केली. त्या सर्व साहित्यिकांची माहिती भित्तिपत्रिके मुळे होण्यास मदत झाली असेही कॅप्टन प्रा.पी.ए. सावंत शेवटी म्हणाले.
    प्रारंभी मराठी विभाग प्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून भित्तिपत्रिका आयोजना मागील उद्देश संगितला. सदर भित्तिपत्रिका नाविन्यपूर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी कु.प्रतिक्षा कोळी हिने तर शेवटी आभारप्रदर्शन डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. ही भित्तिपत्रिका तयार करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.रेश्मा लवटे व प्रा.तेजस गवळी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

संख येथे माजी सैनिकांच्या विविध प्रश्नांबाबत उद्या महामेळाव्याचे आयोजन

जतयेथे महिलांकरिता उद्योजकीय मार्गदर्शन मेळावा व शिबिराचे आयोजन

आरक्षणाबाबतची मराठा समाजाची मागणी मान्य झाल्यानंतर जतेत मराठा बांधवांचा जल्लोष